
इंदापूर उप कारागृहातील सोळा कैद्यांना कोरोनाची लागण
प्रशासनाची वाढली डोखेदुखी
इंदापूर : प्रतिनिधी
इंदापूर तालुक्यातील कोरोनाग्रस्त रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढत असतानाच कोरोनाची एन्ट्री थेट उप कारागृहात झाली असून तब्बल १६ कैद्यांना कोरोनाची लागण झाली आहे.पहिल्यांदा ५ कैद्यांचा कोरोना अहवाल पॉझिटिव्ह आला होता.त्यानंतर (दि.५) रोजी संपर्कातील इतर कैद्यांची तपासणी केल्या नंतर ११ कैद्यांनाही कोरोनाची लागण झाल्याचे निष्पन्न झाले आहे.
यापूर्वी देखील अशाच पद्धतीने २५ ऑगस्ट २०२० रोजी प्रशासनाच्या गलथान कारभारामुळे १७ कैद्यांबरोबरच दोन पोलिसांना कोरोनाची लागण झाली होती.त्यावेळी याबाबतची तक्रार झेंडे पाटील यांनी राष्ट्रीय मानवाधिकार आयोग यांच्याकडे दाखल केली होती.त्यामुळे सर्व कैद्यांची रवानगी रुग्णालयामध्ये करण्यात आली होती.
मात्र पुन्हा तेच घडल्याने संबंधित प्रशासनास याबाबतीत किती गांभीर्य आहे. असा प्रश्न निर्माण झाला असून यापुढे देखील काय बोध घेणार हे महत्त्वाचे ठरणार आहे.
दरम्यान, कारागृहात कोरोनाबाधित आढळून आलेल्या १६ कैद्यांवर इंदापूर उपजिल्हा रुग्णालय येथे उपचार सुरू आहेत.स्थानिक प्रशासनाकडून नागरिकांनी घाबरून न जाता शासनाने घालून दिलेल्या नियम व अटींचे पालन करण्याचे आवाहन करण्यात येत आहे