भूखंड मिळविण्यासाठी उद्योग मंत्र्यांचे बनावट पत्र तयार करण्याचा उद्योग, बारामतीत खळबळ
बारामती पोलिसात गुन्हा दाखल, आरोपी फरार
भूखंड मिळविण्यासाठी उद्योग मंत्र्यांचे बनावट पत्र तयार करण्याचा उद्योग, बारामतीत खळबळ
बारामती पोलिसात गुन्हा दाखल, आरोपी फरार
बारामती वार्तापत्र
उद्योगमंत्र्यांच्या नावे बनावट पत्र तयार करून फसवणूक करण्याचा प्रकार समोर आलाय. बारामती एमआयडीसीतील भूखंड स्वतःच्या मालकीचा करण्यासाठी उद्योगमंत्र्यांच बनावट पत्र बनवल्याचं प्रकार समोर आला आहे. सलीम फकीर महंमद बागवान (वय ५५,रा.कचेरी रोड बारामती ) यांनी दिलेल्या तक्रारीवरून बारामती पोलिसांनी सोहेल शेखविरोधात गुन्हा दाखल केला आहे. गेल्यावर्षी हा प्रकार झाल्याचे तक्रारीत नमूद केले आहे.
भूखंडाचा मालक बनण्यासाठी उद्योगमंत्र्यांच्या नावे बनावट पत्र
बारामती औद्योगिक वसाहतीमधील कटफळ येथील भूखंड स्वतःच्या मालकीचा व्हावा यासाठी उद्योगमंत्री सुभाष देसाई यांच्या नावाचे बनावट शिफारस पत्र तयार करून सरकारची फसवणूक केलीये. सोहेल गुलमोहमंद शेख बागवान याच्या विरोधात बारामती शहर पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद करण्यात आलाय.
सोहेल आणि त्याच्या सासऱ्यामधील वाद मिटवण्यासाठी फिर्यादी सलीम फकीर बागवान यांनी पुढाकार घेतला होता. यासाठी सोहेल याने फिर्यादीची भेट घेतली असता फिर्यादीला कथित पत्र दाखवले.
त्या पत्रात सलीम शेख यांच्या नावे असलेला भूखंड सलीम शेख यंच्या संमती शिवाय सोहेल शेख यांच्या नावाने होईल. मी भूखंड मिळावा यासाठी ऑनलाइन अर्ज केला होता. त्या अनुषंगाने मला मंत्री महोदयांनी मला शिफारस दिली. मी नियमित शासनाची रक्कम भरतो सासऱ्यांनी सरकारी रक्कम न भरल्याने माझी शिफारस झाल्याचे सोहेलने सांगितले. हे पत्र 28 जून 2019 रोजी आलं होतं.
बारामती पोलिसात गुन्हा दाखल, आरोपी फरार
फिर्यादी सलीम फकीर बागवान यांनी माहिती अधिकारात उद्योग व खनिकर्म मंत्रालयात या पत्राची माहिती मागवली. त्यावेळी कोणतेही पत्र त्यावेळी देसाई यांच्या कार्यालयातुन पाठवले नसल्याचे सांगण्यात आलं. त्यामुळे सोहेल विरोधात 5 मार्चला बारामती शहर पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद करण्यात आलाय. सोहेल शेख बागवान हा सध्या फरार आहे.