कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव रोखण्यासाठी करण्यात येणाऱ्या विविध उपाययोजना बाबतची आढावा बैठक संपन्न
कोविड लस ही सुरक्षित असून नागरिकांनी न घाबरता लसीकरण करून घ्यावे, असे आवाहनही डॉ.मनोज खोमणे
कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव रोखण्यासाठी करण्यात येणाऱ्या विविध उपाययोजना बाबतची आढावा बैठक संपन्न
कोविड लस ही सुरक्षित असून नागरिकांनी न घाबरता लसीकरण करून घ्यावे, असे आवाहनही डॉ.मनोज खोमणे
बारामती वार्तापत्र
बारामती तालुक्यात कोरोनाच्या वाढत असलेल्या प्रादुर्भावाच्या अनुषंगाने आज तहसिल कार्यालय, प्रशासकीय भवन, बारामती येथे तहसिलदार विजय पाटील यांच्या उपस्थितीत कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव रोखण्यासाठी करण्यात येणाऱ्या विविध उपाययोजना बाबतची आढावा बैठक आज पार पडली.
या बैठकीसाठी नगरपरिषद मुख्याधिकारी किरणराज यादव , विशेष कार्य अधिकारी हनुमंत पाटील, सिल्व्हर ज्युबली रूग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक डॉ. सदानंद काळे, तालुका आरोग्य अधिकारी डॉ. मनोज खोमणे, ग्रामीण रूग्णालय रूईचे वैद्यकीय अधीक्षक डॉ. सुनिल दराडे , पोलीस विभागातील अधिकारी, जेष्ठ नगरसेवक किरण गुजर व संबंधित विभागाचे अधिकारी उपस्थित होते.
यावेळी तहसिलदार पाटील म्हणाले की , कोरोना पॉझिटिव्ह असलेला एकाही रूग्णाला होम आयसोलेशन मध्ये राहता येणार नाही. डेडीकेटेड कोवीड हेल्थ सेंटर मध्ये नोंद केल्याशिवाय
अथवा वैद्यकीय अधिक्षक व तालुका आरोगय अधिकारी यांचे शिफारसपत्र असल्याशिवाय कोणत्याही खासगी रूग्णालयाला कोविडचे रूग्ण ॲडमीट करून घेता येणार नाही. तसेच वैद्यकीय महाविद्यालय बारामती येथे एक कोविड केअर सेंटर सुरू असून नटराज नाट्य कला मंडळ यांचेमार्फत डॉ. बाबासाहेब आंबेडकर मुलांचे व मुलींचे वसतीगृह येथे दोन कोविड केअर सेंटर पुन्हा सुरू करण्यात येणार आहेत. खासगी शिकवणी वर्ग, लग्नकार्यालय व सभागृहे अशा गर्दीच्या ठिकाणी भरारी पथकांकडून तपासणी केली जाणार आहे व शासन व प्रशासन यांनी कोरोना प्रादुर्भाव रोखण्यासाठी दिलेल्या सूचनांचे पालन होत नसल्याचे आढळून आल्यास कारवाई करण्यात येणार आहे. तरी सर्व नागरिकांनी मास्क , सॅनिटायझर , सोशल डिंस्टसिंग व शासनाच्या सूचनांचे पालन करावे असे, आवाहनही यावेळी तहसिलदार विजय पाटील यांनी केले.
यावेळी कोविड लसीकरणाची माहिती देतांना तालुका आरोग्य अधिकारी मनोज खोमणे म्हणाले की, 08 मार्च 2021 पासून सोमवार , बुधवार , शुक्रवार या दिवशी सर्व ग्रामीण प्राथमिक रूग्णालयात कोविड लसीकरण करण्यात येणार आहे. महिला हॉस्पिटल , बारामती व ग्रामीण रूग्णालय, सुपे येथे सोमवार ते शनिवार यादिवशी कोविड लसीकरण करण्यात येणार आहे. सदरचे लसीकरण हे विनामूल्य आहे. या लसीकरणासाठी प्रथम 60 वर्षावरील जेष्ठ नागरिकांना प्राधान्य देण्यात आले असून यानंतर 45 ते 60 दरम्यान वय असलेल्या कोमाबिर्ड नागरिकांना ही लस देण्यात येणार आहे. तसेच खासगी हॉस्पिटल मध्ये ही लस घ्यावयाची असल्यास त्यासाठी 250/- रूपये शुल्क आकारले जाणार आहे. कोविड लस ही सुरक्षित असून नागरिकांनी न घाबरता लसीकरण करून घ्यावे, असे आवाहनही यावेळी डॉ. खोमणे यांनी केले.