कुख्यात गुंड गज्या मारणेच्या मुसक्या आवळल्या! फिल्मी स्टाईलमध्ये जेरबंद
आज जावळी तालुक्यातील मिळणा परिसरात गजा मारणे आला असल्याची खबर पोलिसांना लागली
कुख्यात गुंड गज्या मारणेच्या मुसक्या आवळल्या! फिल्मी स्टाईलमध्ये जेरबंद
आज जावळी तालुक्यातील मिळणा परिसरात गजा मारणे आला असल्याची खबर पोलिसांना लागली
महाबळेश्वर; बारामती वार्तापत्र
पुणे येथील कुख्यात गुंड गजानन मारणेच्या मुसक्या आवळल्या आहेत.जावळी तालुक्यातील मेढा या ठिकाणी सहाय्यक पोलिस निरीक्षक अमोल माने यांनी गज्याला जेरबंद केला. तळोजा जेलमधून निर्दोष सुटलेला गजा मारणे याने जेलमधून शक्ती प्रदर्शन करत महामार्गावर धुडगूस घातला होता. त्या प्रकरणी पुणे पोलिसांनी त्याच्या विरोधामध्ये गुन्हा दाखल करत त्याला पुन्हा अटक करण्यासाठी यंत्रणा लावली होती.
मात्र पुणे पोलिसांना गुंगारा देत गजा मारणे हा फरार झाला होता आणि तो जावळी तालुक्याच्या हद्दीमध्ये मेढा पोलिस पोलिसांना सापडला. पुणे पोलिसांना हवा असणारा गजा मारणे घटनास्थळावरून फरार झाला होता. तो महाबळेश्वरच्या परिसरात गेल्या काही दिवसापासून फिरत असल्याची माहिती देखील समोर येत होती. मात्र आज जावळी तालुक्यातील मिळणा परिसरात गजा मारणे आला असल्याची खबर पोलिसांना लागली आणि मेढा शहरात डस्टर गाडीतून फिरत असताना सापळा रचत सहाय्यक जेरबंद केले.
खुनाच्या खटल्यातून निर्दोष मुक्तता झाल्यानंतर गजा मारणे याची तळोजा कारागृहापासून पुण्यापर्यंत मिरवणूक काढण्यात आली होती. त्यानंतर पुणे पोलिसांवर माध्यम व सामाजिक स्तरातून टीकेची झोड उठली. त्यानंतर आपल्याला अटक होणार हे लक्षात आल्यानंतर गजा मारणे पोलिसांना गुंगारा देत फरार झाला होता. तो थेट महाबळेश्वर वाई परिसरात गेल्या काही दिवसापासून फिरत होता. डस्टर गाडीतून मेढा येथे आल्याची माहिती पोलिसांना मिळताच डस्टर गाडीमध्ये गजा मारणे आहे याची खात्री पटताच फिल्मी स्टाईल गजा मारणेला मेढा पोलिसांनी सरेंडर होण्याची सुरुवातीला पूर्वसूचना दिली. त्यानंतर गजा मारणे फिल्मी स्टाईलने जेरबंद झाला