गावडेवाडी येथील ‘तो’ व्हिडिओ जाणून बुजून पसरविल्यास मंचर पोलीस करणार कारवाई
पोलिसांबद्दल लोकांमध्ये गैरसमज पसरविण्याचा होतोय प्रयत्न
गावडेवाडी येथील ‘तो’ व्हिडिओ जाणून बुजून पसरविल्यास मंचर पोलीस करणार कारवाई
पोलिसांबद्दल लोकांमध्ये गैरसमज पसरविण्याचा होतोय प्रयत्न
बारामती वार्तापत्र
सध्या सोशल मीडियावर मंचर पोलीस स्टेशनच्या हद्दीतील गावडेवाडी ( ता. आंबेगाव जि. पुणे ) येथे आई-वडिलांना शेतात डबा घेऊन निघालेल्या मुलाला मंचर गावांमध्ये राक्षसी वृत्तीच्या पोलिसांची अमानुषपणे मारहाण अशा मजकुराचा मेसेज व पोलीस अंमलदार मुलाला काठीने मारहाण करतानाचा एक व्हिडिओ मुद्दामून व्हायरल होत असून सदरील व्हिडिओ वायरल करणाऱ्यांवर पोलीस कारवाई करणार आहेत.
सदरचा व्हिडिओ हा जून 2020 मधील असून संबंधित पोलिस अंमलदार यांच्यावर कारवाई देखील झालेले आहे. पण सध्या मंचर पोलिसांनी अवैध व्यवसाय व खंडणीखोर यांच्याविरुद्ध कारवाई केल्यामुळे दुखावलेल्या अवैध व्यावसायिकांकडून हा व्हिडीओ जाणून-बुजून पोलिसांची प्रतिमा खराब करण्यासाठी वायरल केला जात असल्याचे पोलिसांनी प्रसिद्ध केलेल्या पत्रकात म्हटले असून पोलिसांबद्दल लोकांमध्ये गैरसमज पसरवत पोलिस खात्याची प्रतिमा मलिन करण्याच्या हेतूने सदरील व्हिडीओ कोणी वायरल केल्यास त्यांची चौकशी करून कारवाई पोलिसांकडून करण्यात येत आहे.