बारामती शहरामध्ये कोरोनाबाबतचे नियम मोडणाऱ्या नागरिकांवर कारवाई 52,400/- रूपयांचा दंड वसूल
ही कारवाई पोलीस , नगरपालिका व महसूल विभाग यांचेमार्फत

बारामती शहरामध्ये कोरोनाबाबतचे नियम मोडणाऱ्या नागरिकांवर कारवाई 52,400/- रूपयांचा दंड वसूल
ही कारवाई पोलीस , नगरपालिका व महसूल विभाग यांचेमार्फत
बारामती वार्तापत्र
बारामतीमध्ये शहर व ग्रामीण भागत कोरोनाचा वाढत असलेला प्रादुर्भाव रोखण्यासाठी शासन आणि प्रशासन यांचेकडून करण्यात आलेल्या निर्बंधाचे पालन न करणाऱ्या नागरिकांवर आज कारवाई करण्यात आली असून या सर्व 102 नागरिकांकडून रूपये 52,400/- रूपयांचा दंड वसूल करण्यात आला. ही कारवाई पोलीस , नगरपालिका व महसूल विभाग यांचेमार्फत करण्यात आली.
या कारवाई मध्ये विनामास्क फिरणारे नागरिक , विनामास्क व्यवसाय करणारे व्यवसायिक , गर्दीच्या ठिकाणी सोशल डिंस्टसिंग न पाळणारे नागरिक यांचा सामावेश आहे. तसेच शहरामध्ये जे नागरिक कोविड पॉझिटव्ह असून देखील वैद्यकीय अधिक्षक यांची परवानगी नसताना देखील स्वत:हून घरी राहत आहेत अशा 8 रूग्णांना शहरातील बुरूड गल्ली , तांबेनगर , जामदार रोड येथून सिल्व्हर ज्युबिली रूग्णालयात दाखल करण्यात आले. यावेळी प्रशासनाकडून नागरिकांनी मास्क , सॅनिटायझर , सोशल डिंस्टसिंग व शासनाच्या सूचनांचे पालन करून प्रशासनास सहकार्य करावे, असे आवाहनही करण्यात आले.