बारामतीत आज कोरोना पॉझीटीव्ह रुग्ण ३७
बारामती मध्ये एकुण रुग्णांची संख्या ७१३४ वर गेली आहे.

बारामतीत आज कोरोना पॉझीटीव्ह रुग्ण ३७
बारामती मध्ये एकुण रुग्णांची संख्या ७१३४ वर गेली आहे.
बारामती वार्तापत्र
बारामती शहरात २४ आणि बारामती ग्रामीण मध्ये १३ रुग्णसंख्या झालेली आहे.
काल झालेल्या शासकीय rt-pcr नमुन्यामध्ये ४६ नमुन्यामधून एकूण पॉझिटिव्ह ११ रुग्ण आहेत.
तसेच खाजगी प्रयोगशाळेत तपासणी केलेले एकूण rt-pcr ४२ नमुन्यांपैकी १६ रुग्ण पॉझिटिव्ह आले आहेत.
तर एंटीजनच्या ३९ नमुन्यांपैकी एकूण ९ रुग्ण पॉझिटिव्ह आले आहेत.
त्यामुळे काल दिवसभरातील बारामतीतील एकूण पॉझिटिव्ह रुग्ण संख्या ३७ झाली आहे.
काल झालेल्या शासकीय प्रयोगशाळेत आरटीपीसीआर तपासणीत आढळलेल्या कोरोनाग्रस्तांमध्ये जळोची येथील ३२ वर्षीय पुरुष, पणदरे येथील ५१ वर्षीय पुरुष, २० वर्षीय पुरुष, ग्रीन पार्क येथील २१ वर्षीय पुरुष, गुणवडी येथील ५५ वर्षीय पुरुष, एमआयडीसी येथील ३० वर्षीय पुरुष, दशरथ नगर येथील २३ वर्षीय पुरुष, ग्रीन पार्क येथील ५० वर्षीय पुरुष, ४० वर्षीय महिला, माळेगाव येथील ५१ वर्षीय पुरुष, चौधर वस्ती येथील २५ वर्षीय पुरुष कोरोना बाधित आढळून आले आहेत.
बारामतीत काल खाजगी प्रयोगशाळेत मंगल लॅबोरेटरी येथे तपासलेल्या रॅपिड अँटीजेन तपासणीत आढळलेल्या कोरोनाग्रस्तांमध्ये भंडारे हॉस्पिटल रिंग रोड येथील १२ वर्षीय मुलगी, जळोची येथील ४७ वर्षीय महिला, बुरुड गल्ली येथील ६४ वर्षीय पुरुष, कॉलनी येथील ७६ वर्षीय पुरुष,जळोची येथील ३५ वर्षीय पुरुष, वालनट रेसिडेन्सी प्रगती नगर येथील ३५ वर्षीय पुरुष, २५ वर्षीय महिला, ३० वर्षीय पुरुषष सिद्धेश्वर अपार्टमेंट बारामती हॉस्पिटल शेजारी ३९ वर्षीय पुरुष, स्वयंभू अपार्टमेंट कल्याणी कॉर्नर ६३ वर्षीय महिला, यशदीप बांगला अशोक नगर येथील ५६ वर्षीय पुरुष,माळेगाव येथील ३३ वर्षीय पुरुष, वडगाव निंबाळकर येथील ७८ वर्षीय महिला, पणदरे येथील ४४ वर्षीय पुरुष व येथील ६८ वर्षीय पुरुष, माळेगाव बुद्रुक येथील ५७ वर्षीय पुरुष, ३४ वर्षीय पुरुष, मेडद येथील ३९ वर्षीय पुरुष, अमराई येथील ७७ वर्षीय पुरुष आणि रुई नजीक विठ्ठल मंदिर येथील ५० वर्षीय महिला कोरोनाबाधित आढळून आले आहेत.
बारामतीतील आज पर्यंत एकूण रुग्ण संख्या ७१३४ तर एकूण बरे झालेले रुग्ण ६५५४ एकूण मृत्यू १४७.
तुम्ही काळजी घ्या ,अनावश्यक गर्दी टाळा ,सॅनिटायझर ,मास्कचा वापर करा.