कोरोंना विशेष

अबब ! बारामतीत कोरोनाचा कहर एकाच दिवसात ८० रुग्ण पॉझिटिव्ह

बारामती मध्ये एकुण रुग्णांची संख्या १४७ वर गेली आहे

अबब ! बारामतीत कोरोनाचा कहर एकाच दिवसात ८० रुग्ण पॉझिटिव्ह.

बारामती मध्ये एकुण रुग्णांची संख्या १४७ वर गेली आहे.

बारामती वार्तापत्र

बारामती शहरात ५६ आणि बारामती ग्रामीण मध्ये २४ रुग्णसंख्या झालेली आहे.

काल झालेल्या शासकीय rt-pcr नमुन्यामध्ये ३२५ नमुन्यामधून एकूण पॉझिटिव्ह ४७ रुग्ण आहेत
तसेच खाजगी प्रयोगशाळेत तपासणी केलेले एकूण rt-pcr २४ नमुन्यांपैकी ७ रुग्ण पॉझिटिव्ह आले आहेत.
तर एंटीजनच्या ४८ नमुन्यांपैकी एकूण २६ रुग्ण पॉझिटिव्ह आले आहेत.

बारामतीत काल झालेल्या विविध शासकीय प्रयोगशाळेत  रॅपिड तपासण्यांमध्ये आढळलेल्या कोरोनाग्रस्तांमध्ये रुई येथील २६ वर्षीय महिला ६५ वर्षीय महिला ८ वर्षीय मुलगा २८ वर्षीय महिला ३१ वर्षीय महिला सूर्या हॉटेल येथील ३४ वर्षीय पुरुष घाडगे वस्ती ५९ वर्षीय पुरुष ५५ वर्षीय महिला ५३ वर्षीय महिला ४३ वर्षीय महिला ५२ वर्षीय पुरुष रुग्ण आढळून आले आहेत

बारामतीत काल झालेल्या शासकीय प्रयोगशाळेत आरटीपीसीआर तपासण्यांमध्ये आढळलेल्या कोरोनाग्रस्तांमध्ये पणदरे येथील ६८ वर्षीय पुरुष, काटेवाडी येथील ३८ वर्षीय महिला, १५ वर्षीय मुलगा, १६ वर्षीय मुलगी, ६५ वर्षीय महिला, गुणवडी येथील ४३ वर्षीय पुरुष, मोरगाव येथील पन्नास वर्षे पुरुष, काटेवाडी येथील ३० वर्षीय महिला, कसबा येथील ४८ वर्षीय महिला, सोनगाव येथील ७२ वर्षीय पुरुष, जळोची येथील ६० वर्षीय महिला, मुढाळे येथील ५६ वर्षीय पुरुष रूग्णाचा समावेश आहे.

काऱ्हाटी येथील ३० वर्षीय महिला, जैनकवाडी येथील ४ वर्षीय मुलगी, ३८ वर्षीय महिला, धुमाळवाडी येथील १० वर्षीय मुलगा, माळेगाव बुद्रुक येथील ५२ वर्षीय पुरुष, येथील २८ वर्षीय महिला, कसबा येथील ५८ वर्षीय महिला, तांदुळवाडी येथील ४५ वर्षीय महिला, निरा येथील ४९ वर्षीय पुरुष, येथील ३२ वर्षीय पुरुष, गोकुळ वाडी येथील ३७ वर्षीय पुरुष, महादेव मळा येथील ५७ वर्षीय पुरुष, ५० वर्षीय महिलेचा समावेश आहे.

बारामती शहरातील ४२ वर्षीय पुरुष, १४ वर्षीय मुलगी, ९ वर्षीय मुलगी, ३७ वर्षीय पुरुष, कसबा येथील ८ वर्षीय मुलगा, कसबा येथील ४२ वर्षीय पुरुष, फलटण रोड येथील २९ वर्षीय महिला, बुरुड गल्ली येथील २० वर्षीय महिला, मोरगाव येथील ४५ वर्षीय पुरुष, सिकंदर नगर येथील ७३ वर्षीय महिला, नेवसे रोड येथील १३ वर्षीय मुलाचा समावेश आहे.

माऊली नगर येथील ३४ वर्षीय महिला, मार्केट यार्ड येथील २९ वर्षीय पुरुष, प्रगती नगर येथील ४० वर्षीय पुरुष, लासुर्णे येथील ७० वर्षीय महिला, सायली हिल येथील ३५ वर्षीय पुरुष, सुभाष चौक येथील ३७ वर्षीय महिला, सूर्यनगरी येथील ४२ वर्षीय पुरुष, तांदूळवाडी येथील ३१ वर्षीय पुरुष, गुणवडी येथील २८ वर्षीय पुरुष, काटेवाडी येथील ३५ वर्षीय पुरुष, सुपा येथील ४० वर्षीय महिला, माळेगाव येथील ८४ वर्षीय पुरुष, कोऱ्हाळे बुद्रुक येथील ६५ वर्षीय पुरुष रुग्णाचा समावेश आहे.

बारामतीत काल खाजगी प्रयोगशाळेत मंगल लॅबोरेटरी येथे तपासलेल्या विविध तपासण्यांमध्ये आढळलेल्या कोरोनाग्रस्तांमध्ये रुई येथील विठ्ठल मंदिरा शेजारील ५६ वर्षीय पुरुष, ५९ वर्षीय महिला, संघवी पार्क इंदापूर रोड येथील ४० वर्षीय महिला, सुनील शहा हॉस्पिटल शेजारी १८ वर्षीय मुलगा, प्रगती नगर येथील ५६ वर्षीय पुरुष, निवास जळोची रोड येथील ३१ वर्षीय पुरुष, रुई येथील इंद्रायणी निवास शेजारील २५ वर्षीय मुलगी, ७ वर्षीय मुलगी, ३२ वर्षीय महिला, अकरा वर्षीय मुलगा, ३६ वर्षीय महिला, १० वर्षीय मुलगा, ६० वर्षीय महिला, ३२ वर्षीय महिला, सहा वर्षीय मुलगी, देशपांडे इस्टेट येथील ३६ वर्षीय पुरुषाचा समावेश आहे.

जैनकवाडी येथील ४१ वर्षीय पुरुष, अशोकनगर कमलपुष्प बंगला येथील ५९ वर्षीय पुरुष, समृद्धी अपार्टमेंट येथील ६२ वर्षीय पुरुष, वडगाव निंबाळकर येथील ६८ वर्षीय पुरुषाचा समावेश आहे.

त्यामुळे काल दिवसभरातील बारामतीतील एकूण पॉझिटिव्ह रुग्ण संख्या ८० झाली आहे

बारामतीतील आज पर्यंत एकूण रुग्ण संख्या ७२१४ तर एकूण बरे झालेले रुग्ण ६६३८ एकूण मृत्यू १४७.

तुम्ही काळजी घ्या ,अनावश्यक गर्दी टाळा ,सॅनिटायझर ,मास्कचा वापर करा.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button