इंदापूर

नगरपरिषद हद्दीत सुरु असलेल्या कामाची फेर निविदा काढण्याची भाजपची मागणी

सार्वजनिक बांधकाम विभागास दिले निवेदन

नगरपरिषद हद्दीत सुरु असलेल्या कामाची फेर निविदा काढण्याची भाजपची मागणी

सार्वजनिक बांधकाम विभागास दिले निवेदन

इंदापूर : प्रतिनिधी
सार्वजनिक बांधकाम विभागाकडून इंदापूर नगरपरिषद हद्दीमध्ये सुरु असलेल्या विकासकामांचा केलेला आराखडा, प्रत्यक्ष मापे, कागदोपत्री निविदा व प्रत्यक्ष विकासकामे यामध्ये ४० टक्के तफावत आढळून आल्याने संबंधित विभागाने सदर कामाची प्रत्यक्ष जागेवर जाऊन तपासणी करावी व जागेवरील मापानुसार फेर निविदा काढाव्यात अशी मागणीचे भारतीय जनता पार्टीच्या वतीने उपअभियंता सार्वजनिक बांधकाम विभाग इंदापूर यांच्याकडे निवेदनाद्वारे करण्यात आली.

यावेळी भाजपचे इंदापूर शहराध्यक्ष शकिलभाई सय्यद, इंदापूर अर्बन बँकेचे चेअरमन भरत शहा, उपनगराध्यक्ष धनंजय पाटील, गटनेते कैलास कदम, दुधगंगाचे चेअरमन मंगेश पाटील, सागर गानबोटे, इंदापूर अर्बन बँकेचे संचालक दादासाहेब पिसे आदी पदाधिकारी उपस्थित होते.

शहराध्यक्ष शकीलभाई सय्यद म्हणाले,’ इंदापूर शहरातील विकासकामांबद्दल नागरिकांमध्ये संभ्रमावस्था आहे. सार्वजनिक बांधकाम विभागाकडून केलेला आराखडा, प्रत्यक्ष मापे, कागदोपत्री निविदा व प्रत्यक्ष विकासकामे यामध्ये आढळून आलेली ४० टक्के तफावत आढळत आहे. या सुरु असलेल्या कामांमध्ये अंडरग्राऊंड सांडपाण्याची व्यवस्था करण्यात आली नसल्याने भविष्यात पुन्हा तयार केलेले काँक्रिटीकरण व रस्ते उकरवावे लागणार असल्याने वेळेचा तसेच पैशाचाही अपव्यव होणार आहे. वाढीव कामाची निघणारी रक्‍कम याचा लाभ नक्की कोणाला होणार आहे ? याचा जाब द्यावा. सदर चुकीच्या निविदा रद्द करुन फेर निविदा काढाव्यात अन्यथा इंदापूर तालुका भारतीय जनता पार्टीच्या वतीने तीव्र आंदोलन करण्यात येईल असा इशाराही त्यांनी यावेळी दिला.

मंगेश पाटील यांनी शहर विकासाच्या कामांचा निधी सार्वजनिक बांधकामाकडे वर्ग करणे योग्य आहे का? असा सवाल उपस्थित करत सदर विकासकामे नगरपरिषद हद्दीमध्ये प्रामाणिकपणे करावयाची असतील तर राज्यमंत्र्यांनी या कामाचा निधी नगरपरिषदेकडे वर्ग करुन इंदापूर नगरपरिषदेमार्फत निविदा काढून कामे करुन घ्यावीत सदर निधी आपल्या सार्वजनिक बांधकाम विभागाकडे वर्ग करण्याच्या पाठीमागे काय गौडबंगाल आहे. याचा खुलासा करावा असे यावेळी म्हंटले.

गटनेते कैलास कदम म्हणाले की, सार्वजनिक बांधकाम विभाग हा शासकीय की, राष्ट्रवादी पक्षाचा मोहताज आहे असा आरोप करुन संबंधित अधिकारी हे आम्ही आराखडा बनवला, परंतु कामाची मापे ही स्थानिक राष्ट्रवादी नगरसेवकांकडून आलेली आहेत. असे वक्तव्य करत असतील तर सार्वजनिक बांधकाम विभाग हा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या नियंत्रणाखाली काम करत असल्याचा आरोप केला. सदर कामे ही शासकिय नियमानुसारच होणे आवश्यक आहे. परंतु राष्ट्रवादीचे नगरसेवक हे अधिका-यांना खोटी माहिती देऊन त्यांच्यावर सत्तेचा दबाव आणून आपल्याला पाहिजे तशी कामे मंजूर करुन केवळ भ्रष्टाचार करुन पैसे कमविणे हाच मुख्य उद्देश असल्याचे म्हणत यासाठी राष्ट्रवादीच्या नगरसेवकांना सार्वजनिक बांधकाम विभागाचे मंत्री पाठीशी घालत असल्याचा आरोपही कदम यांनी यावेळी केला.

आमचा कोणत्याही विकास कामास विरोध नाही. परंतु आपण काढलेले टेंडर हे राजकिय दबावापोटी काढल्याचे जाणवत आहे.अधिकार्‍यांनी मंत्री महोदयांच्या दबावाला बळी न पडता वाढीव मापे देणा-या भ्रष्ट कारभा-यांची नावे जाहीर करावीत. तसेच चुकीचे इस्टिमेट सादर करणा-या इंजिनिअरवर कारवाई करावी अशी मागणी कदम यांनी यावेळी केली.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!