लाकडी निंबोडी बस एक ट्रेलर है, पिक्चर अभी बाकी है – राज्यमंत्री दत्तात्रेय भरणे
इंदापूर येथील पत्रकार परिषदेत राज्यमंत्र्यांचा विरोधकांवर सिने स्टाईलने उपरोधिक टोला

लाकडी निंबोडी बस एक ट्रेलर है, पिक्चर अभी बाकी है – राज्यमंत्री दत्तात्रेय भरणे
इंदापूर येथील पत्रकार परिषदेत राज्यमंत्र्यांचा विरोधकांवर सिने स्टाईलने उपरोधिक टोला
इंदापूर : प्रतिनिधी
इंदापूर प्रशासकीय विश्रामगृह या ठिकाणी कोरोनाच्या पार्श्वभूमीवर राज्यमंत्री दत्तात्रय भरणे यांच्या प्रमुख उपस्थिती मध्ये आढावा बैठक संपन्न झाली. यानंतर पत्रकारांना बोलताना राज्यमंत्री दत्तात्रय भरणे यांनी लाकडी निंबोडी बस ट्रेलर है, पिक्चर अभी बाकी है असे म्हणत विरोधकांना अनुसरून सिनेस्टाईलने उपरोधिक टोला लगावला.
यावेळी राज्यमंत्री भरणे म्हणाले की, बारामती व इंदापूर तालुक्यासाठी गेल्या ३५ वर्षांपासून हा खूप महत्त्वाचा विषय होता.आपल्या भागातील दुष्काळी पट्टा असणाऱ्या लाकडी-निंबोडी, निरगुडे,म्हसोबाचीवाडी,वायसेवादी,धायगुडेवाडी येथील लोकांची मागणी असताना ही योजना होत नव्हती परंतु मी स्वतः व आपल्या खासदार सुप्रिया सुळे, उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या माध्यमातून या योजनेसाठी प्रयत्न केला.या परिसरातील लोकांना न्याय मिळाला पाहिजे,त्यांना हक्काचं पाणी मिळालं पाहिजे यांच्यावर असणारा जिरायती भाग असण्याचा जो शिक्का आहे तो संपवला पाहिजे, त्यासाठी सर्वांनी जास्त लावून धरले व उपमुख्यमंत्री अजितदादांनी योजना पूर्ण करेन म्हणून जो शब्द दिला होता तो पाळला.लाकडी निंबोडी ही योजनेमुळे इंदापूर तालुक्यातील ११ गावांसह बारामती तालुक्यातील ५ गावांना सुमारे ७ हजार दोनशे हेक्टर म्हणजेच जवळपास १७ ते १७ हजार ५०० एकराला पाणी मिळणार असून ही योजना खूप महत्त्वाची असल्याचं यावेळी राज्यमंत्री भरणेंनी सांगितले.
पुढे बोलताना राज्यमंत्री म्हणाले की,उजनी जलाशयातून पाणी उचलून शेजारील पोंधवडी तलावात टाकणार आहे.दुसऱ्या स्टेप मध्ये तेच पाणी जैनकवाडी किंवा उंच ठिकाणी मध्य धरून सर्वांना पाणी मिळेल अशी योजना राहणार आहे. त्यामुळे या योजनेचा फायदा जिरायती पट्ट्यास प्रामाणिकपणे होणार आहे. तालुक्याच्या दृष्टीने हा अत्यंत महत्त्वाचा निर्णय झालेला असून माझं यापुढे उद्दिष्ट खूप महत्त्वाचा आहे.हे मंत्रिपद मला मिरवायच नाही, उरलेल्या काही वर्षात खूप कामे करायची असून लाकडी-निंबोडी ट्रेलर है, पिक्चर अभी बाकी है असे म्हणत पुढच्या तीन पिढ्यांना पाणी कमी पडणार नाही अशा प्रकारच्या योजना मनामध्ये आहेत असे राज्यमंत्री दत्तात्रय भरणे यांनी यावेळी नमूद केले.
यावेळी इंदापूर तालुक्यातील पत्रकार भवना संदर्भात विचारलेल्या प्रश्नाला प्रत्युत्तर देताना राज्यमंत्री म्हणाले की, स्थानिक प्रशासनाकडून जागा उपलब्ध करा.इमारत बांधून मी पूर्ण करतो असे म्हणत अनेक वर्षांपासून प्रलंबित असणाऱ्या पत्रकार भवनाच्या प्रश्नाला राज्यमंत्र्यांनी पूर्णविराम दिला.