भूविकास बँकेच्या थकबाकीदारांना सातबारा कोरा करण्याची संधी
एक रक्कमी कर्ज परतफेड योजना थकबाकीदार शेतक-यांसाठी शेवटची संधी म्हणुन सरकार ही योजना राबवित आहे.

भूविकास बँकेच्या थकबाकीदारांना सातबारा कोरा करण्याची संधी
एक रक्कमी कर्ज परतफेड योजना थकबाकीदार शेतक-यांसाठी शेवटची संधी म्हणुन सरकार ही योजना राबवित आहे.
बारामती वार्तापत्र
भुविकास बँकेची थकबाकी भरण्यासाठी महाराष्ट्र राज्य सरकारचे वतीने शेतक-यांसाठी एक रक्कमी कर्जपरतफेड (ओ.टी.एस.) योजना राबविण्यात येत आहे दिनांक ३१ मार्च २०२१पर्यंत या योजने मध्ये सहभागी होऊन शेतक-यांनी त्यांच्याकडे असलेली थकबाकी त्वरीत भुविकास बॅके मध्ये भरावी आणि आपली ७/१२ उतारा कोरा करून घ्यावा, असे आवाहन श्री मिलिंद सोबले जिल्हा उपनिबंधक सहकारी संस्था पुणे ग्रामीण तथा अवसायक भूविकास बँक पुणे यांनी केले आहे.
महाराष्ट्र शासनाने दिनांक २० ऑक्टोंबर २०२० रोजी भूविकास बँकेच्या कर्जदार थकबाकीदारांसाठी एक रक्कमी कर्ज परतफेड योजना (ओ.टी.एस.) राबविण्याचा धोरणात्मक निर्णय जाहीर केलेला आहे.दिर्घ कालावधीपासुन थकीत कर्ज विचारात घेता एक रक्कमी कर्ज परत फेड योजनेचा जास्तीत जास्त शेतकरी सभासदांना लाभ घेता यावा यासाठी या योजनेला दिनांक ३१ मार्च २०२१पर्यंत मुदत वाढ
देऊन योजना राबविण्याचा शासनाने निर्णय घेतलेला आहे.
एक रक्कमी कर्ज परतफेड योजना थकबाकीदार शेतक-यांसाठी शेवटची संधी म्हणुन सरकार ही योजना राबवित आहे.पुणे जिल्हा भूविकास बँकेचे सदर योजनेसाठी एकूण ३५१ सभासद कर्ज मागणी ६४१.३१ लाख थकबाकी पैकी दिनांक ९ मार्च २०२१ अखेर २२ थकबाकीदार सभासदांनी रक्कम रू.४२,६८,०००/-चा भरणा करून एक रक्कमी कर्जपरतफेड (ओ.टी.एस.) योजनेचा लाभ घेऊन
आपला ७/१२ उतारा कोरा करून घेतलेला आहे. तरी भूविकास बँकेच्या कर्जदार शेतकरी सभासदांना आवाहन करण्यात येते की त्यांनी दिनांक ३१ मार्च २०२१ पर्यंत त्यांचे कडील थकबाकी रक्कम बँकेचे मुख्य कार्यालय पुणे १ सेंट्रल बिल्डिंग समोर, बी.जे.रोड पुणे स्टेशन जवळ , तसेच गुलटेकडी मार्केट यार्ड, येथील हवेली शाखा, इंदापूर शाखा व शिरूर शाखा येथील कार्यालयांशी संपर्क साधुन या योजनेचा लाभ घ्यावा आणि आपला आपला ७/१२ उतारा कोरा करून घ्यावा असे अवाहन करण्यात येत आहे.
मुख्य कार्यालया पुणे दुरध्वनी क्रमांक – ०२०-२६१२५१०३
शाखा कार्यालय शिरूर-८८०५१७८३७६
शाखा कार्यालय इंदापूर-८७८८६५६९५६
शाखा कार्यालय शिरूर-९७६६४८६५९७