क्राईम रिपोर्ट

उंडवडीत … पुन्हा चोरं चोरं, एकाला पकडले. 

चोराला गावकऱ्यांनी चोप देवून तालुका पोलिसांच्या ताब्यात दिले.

उंडवडीत …पुन्हा  चोरं चोरं, एकाला पकडले. 

चोराला गावकऱ्यांनी चोप देवून तालुका पोलिसांच्या ताब्यात दिले.

उंडवडी कडेपठार; बारामती वार्तापत्र

काल रात्री चोरट्यानी पुन्हा धुमाकूळ घालून गावकऱ्यांची झोप उडवली. गस्तीवरील युवकांनी एकाला शिताफीने पकडून पोलिसांच्या ताब्यात दिले. येथे चार दिवसापूर्वीचं चोरट्यांच्या हल्यात एका जेष्ठाचा मृत्यू झाल्याची घटना ताजी असतानाच पुन्हा चोरट्यांचा चोरीचा डाव ग्रामस्थांच्या सतर्कतेमुळे उधळला.

उंडवडी कडेपठार येथे चार दिवसापूर्वी अज्ञात चोरट्यानी जराडवस्तीवर हल्ला केला होता. यामध्ये जेष्ठ नागरीक निवृत्ती विष्णू जराड यांचा रुग्णालयात उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे. या घटनेनंतर परिसरात चोरट्यांची भिती पसरली आहे. त्यानंतर गावकरी जागृत राहून रात्रीचे गस्त घालत आहेत.

सोमवारी रात्री ( ता. 15) साडे दहा वाजण्याच्या दरम्यान काही युवक दादासाहेब जराड यांच्या वस्तीनजिक गस्तीवर असताना त्यांना बारामती – उंडवडी रस्त्याच्या बाजूला एक मारुती कंपनीची चारचाकी अलटो कार (नंबर प्लेट नसलेली) व एक हिरो होंडा कंपनीची फॅशन दुचाकी (नंबर प्लेट  नसलेली) रस्त्याला लावल्याचे संशयास्पद आढळून आली.

त्यामुळे युवकांनी आजूबाजूला पाहणी केल्यानंतर पाच ते सहा चोरटे पोकलेश मशिनचे ब्रेकर बांधत असल्याचे दिसले. युवकांनी घटनेचे गांभीर्य ओळखून चोरांना  पकडण्याचा प्रयत्न केला. त्यावेळी पाच चोरटे  चारचाकी कारमध्ये बसून पळून गेले. तर एक चोर दुचाकीसह गस्त पथकातील युवकांच्या हाती लागला. या चोराला गावकऱ्यांनी चोप देवून तालुका पोलिसांच्या ताब्यात दिले.

या घटनेनंतर गावकऱ्यांना ‘जागते रहो’ चा कडक पहारा देवून रात्र जागून काढावी लागली. येथे चार दिवसापूर्वी झालेल्या चोरीचा तपासासह रात्री एकाला रंगेहाथ पकडलेल्या चोराकडून गुन्हाची माहितीची उखल करण्याचे आवाहन पोलिसांसमोर आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button