स्थानिक

बारामती तालुका प्रशासनातर्फे शहीद दिन साजरा

त‍हसिल कार्यालयातील सर्व कर्मचारी उपस्थित

बारामती तालुका प्रशासनातर्फे शहीद दिन साजरा

त‍हसिल कार्यालयातील सर्व कर्मचारी उपस्थित

बारामती वार्तापत्र

बारामती तालुका प्रशासनाच्या वतीने शहीद भगतसिंग, राजगुरू व सुखदेव यांच्‍या प्रतिमेस तहसिलदार विजय पाटील यांच्‍या हस्‍ते पुष्‍पहार अर्पण करून शहीद दिन साजरा करण्‍यात आला.

यावेळी तहसिलदार पाटील म्‍हणाले की, भारताच्‍या स्‍वातंत्र्य लढ्यासाठी प्राणांची आहुती देणारे शहीद भगतसिंग, राजगुरू व सुखदेव यांच्‍या स्‍मृती जागृत राहाव्‍यात याकरीता शासनातर्फे 23 मार्च हा त्‍यांच्‍या पुण्‍यतिथीचा दिवस शहीद दिन म्‍हणून साजरा करण्‍यात येतो.

या कार्यक्रमासाठी नायब तहसिलदार महादेव भोसले, नायब तहसिलदार पी. डी. शिंदे व त‍हसिल कार्यालयातील सर्व कर्मचारी उपस्थित होते.

Back to top button