बारामती शहरातील पिंपळी भागात गावठी हातभट्टीची दारू तयार करणाऱ्या महिलेवर कारवाई
एकूण १०,६००/- रु. माल जप्त करण्यात आला आहे.

बारामती शहरातील पिंपळी भागात गावठी हातभट्टीची दारू तयार करणाऱ्या महिलेवर कारवाई
एकूण १०,६००/- रु. माल जप्त करण्यात आला आहे.
बारामती वार्तापत्र
बारामती शहरातील इंद्रायणीनगर झोपडपट्टी पिंपळी भागात बेकायदेशीर गावठी हातभट्टीची दारू तयार करणाऱ्या एका महिलेवर कारवाई करण्यात आली आहे.
अल्का शशीकांत पवार, असे कारवाई करण्यात आलेल्या महिला आरोपीचे नाव आहे. याबाबत उपविभागीय पोलीस अधिकारी कार्यालय, बारामती विभागच्या महिला पोलीस नाईक अमृता भोईटे यांनी फिर्याद दिली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, दि. २३ मार्चला इंद्रायणीनगर झोपडपट्टी पिंपळी येथे आरोपी अल्का ही तिच्या घराच्या जवळील झुडपात निराडावा कॅनॉलच्या ठिकाणी खड्डे खणून, चूल लावून गावठी हातभट्टी दारू तयार करीत असताना पोलिसांना दिसली. तिच्यावर बारामती शहर पोलीस स्टेशन येथे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तिच्या ताब्यातील गावठी हातभट्टी दारू तयार करण्यासाठी वापरलेले लोखंडी बॅरल, कच्चे रसायन असा एकूण १०,६००/- रु. माल जप्त करण्यात आला आहे.
पुढील तपास बारामती शहर पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक शिंदे करीत आहेत.