दस्त नोंदणीचे कामकाज 27 व 29 मार्चला सुरु
या संधीचा जास्तीत जास्त नागरीकांनी लाभ घ्यावा असे आवाहन

दस्त नोंदणीचे कामकाज 27 व 29 मार्चला सुरु
या संधीचा जास्तीत जास्त नागरीकांनी लाभ घ्यावा असे आवाहन
पुणे ; बारामती वार्तापत्र रिपोर्ट
महाराष्ट्र शासनाने माहे डिसेंबर 2020 अखेर व माहे मार्च 2021 अखेर पर्यंत मुद्रांक शुल्कांत घोषित केलेल्या सवलतीचा जास्तीत जास्त नागरीकांना लाभ मिळावा, यासाठी दस्तऐवज नोंदणीची सुविधा पुणे ग्रामीण जिल्ह्यातील सर्व सह दुय्यम निबंधक वर्ग -2 , दुय्यम निबंधक श्रेणी-1 कार्यालये माहे मार्च महिन्यातील शनिवार दि. 27 मार्च 2021 व दि. 29 मार्च 2021 या सार्वजनिक सुट्टीच्या दिवशी सर्व सह दुय्यम निबंधक वर्ग 2/ दुय्यम निबंधक श्रेणी-1 कार्यालये कार्यालयीन वेळेत दस्त नोंदणी व कार्यालयीन कामकाजासाठी सुरु ठेवण्यात येत आहेत.
या संधीचा जास्तीत जास्त नागरीकांनी लाभ घ्यावा असे आवाहन डी.पी. पाटील, सह जिल्हा निबंधक वर्ग -1 तथा मुद्रांक जिल्हाधिकारी , पुणे ग्रामीण यांनी केले आहे.