इंदापूर तालुक्यातील १२८ कोटी रुपयांच्या विकास कामांची उद्घाटने खा.सुप्रिया सुळे यांच्या हस्ते संपन्न
ऑनलाईन भूमिपूजन सोहळा पडला पार

इंदापूर तालुक्यातील १२८ कोटी रुपयांच्या विकास कामांची उद्घाटने खा.सुप्रिया सुळे यांच्या हस्ते संपन्न
ऑनलाईन भूमिपूजन सोहळा पडला पार
इंदापूर : प्रतिनिधी
इंदापूर तालुक्यातील १२८ कोटी रुपयांच्या विकास कामांची उद्घाटने खा.सुप्रिया सुळे यांच्या शुभहस्ते व महाराष्ट्र राज्याचे राज्यमंत्री तथा सोलापूर चे पालकमंत्री दत्तात्रय भरणे यांच्या हस्ते कोरोनाच्या पार्श्वभूमीवर ऑनलाईन पध्दतीने पार पडली.
यावेळी बोलताना राज्यमंत्री भरणे म्हणाले की,कोरोनाचे संकट असल्याने मोठा कार्यक्रम घेता आला नाही. गेल्या पाच-सहा महिन्यांपूर्वी निविदा प्रक्रिया झाली. त्या कामांचा शुभारंभ आज पार पडत आहे. खासदार सुप्रिया सुळे यांनी आज त्यां कामांचं उद्घाटन केलं. खरं तर आमच्या सर्वांचे नशीब आज एवढे चांगलं की पवार साहेबांनी या कार्यक्रमास ऑनलाइन हजेरी लावली. त्यामुळे इंदापूर तालुक्यातील जनतेसह कार्येकर्त्याना आनंद झाला. त्यांच्या हजेरीमुळे आमची स्फूर्ती अधिक वाढली. सदरील कामे पुढील तीन ते चार महिन्यांमध्ये कशी मार्गी लागतील दिवाळीपर्यंत सर्व रोड कसे तयार होतील याची काळजी घेतली जाईल. तसेच कामांची गुणवत्ता राखली जाईल याची काळजी नागरिकांनी घ्यावी, काम जर चुकीचे होत असेल तर ते ताबडतोब थांबवावे,अधिकार्यांशी संपर्क करावा किंवा माझ्याशी संपर्क करावा जेणेकरून कामाची गुणवत्ताही चांगली राहील अशा सूचना यावेळी भरणेंनी उपस्थितांना केल्या.
यावेळी खा.सुप्रिया सुळे म्हणाल्या की, राज्यमंत्री दत्तात्रय भरणे यांच्या माध्यमातून इंदापूर तालुक्यामध्ये सर्वात जास्त निधी आणण्याचं काम झाले असून इंदापूर तालुक्याच्या विकासासाठी राज्यमंत्री चांगले काम करत आहे.
तसेच राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष प्रदीप गारटकर म्हणाले की, होणारी सर्व विकासकामे दर्जेदार व गुणवत्तापूर्ण करून घ्यायचे काम हे आपणा सर्वांचे आहे. इंदापूर तालुक्याचे लोकप्रतिनिधी दत्तात्रय भरणे यांच्या माध्यमातून इंदापूर तालुक्यात मोठ्या प्रमाणात विकास निधी आलेला असून यापुढे ही येत राहील.
यावेळी अध्यक्ष हनुमंत कोकाटे, कार्याध्यक्ष अतुल झगडे, प्रविण डोंगरे ,रहिना मुलाणी,मच्छिंद्र चांदणे,शुभम निंबाळकर, हमा पाटील यांसह सर्व जिल्हा परिषद सदस्य. पंचायत समिती सदस्य,विविध संस्थांचे पदाधिकारी,सरपंच, उपसरपंच ग्रामपंचायत सदस्य व सर्व पदाधिकारी हे उद्घाटनप्रसंगी उपस्थित होते.