कोरोंना विशेष

अजित पवारांचे मोठे वक्तव्य! पंचवीस वर्षावरील तरुणांनाही कोरोना लस द्या ,,,केंद्र सरकारकडे करणार मागणी

45 वर्षाखालील ज्यांना डायबिटीजसारख्या अन्य व्याधी आहेत, त्यांना कोरोना लस देण्यात यावी अशी मागणी राज्य सरकार केंद्र सरकारकडे करणार आहे

अजित पवारांचे मोठे वक्तव्य! पंचवीस वर्षावरील तरुणांनाही कोरोना लस द्या ,,,केंद्र सरकारकडे करणार मागणी

45 वर्षाखालील ज्यांना डायबिटीजसारख्या अन्य व्याधी आहेत, त्यांना कोरोना लस देण्यात यावी अशी मागणी राज्य सरकार केंद्र सरकारकडे करणार आहे

बारामती वार्तापत्र

आज विद्या प्रतिष्ठान च्या माहिती व तंत्रज्ञान विभागाच्या सभागृहात उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी बारामती तालुक्यातील अधिकार्‍यांची बैठक घेतली. यामध्ये कोरोना विषाणू नियंत्रणाच्या संदर्भात चालू असलेल्या उपाययोजना, तसेच करावयाच्या उपाययोजना यांची माहिती त्यांनी अधिकाऱ्यांकडून घेतली. यावेळी त्यांना अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार पवार यांनी बारामतीतील लसीकरणाचा वेग वाढविण्याचे आदेश दिले.

त्यानुसार येत्या दोन दिवसात आरोग्य केंद्रासह आरोग्य उपकेंद्रांच्या ठिकाणी तसेच आरोग्यवर्धिनी केंद्रावरही लसीकरण सुरू करण्याचे निर्देश त्यांनी दिले आहेत. जेणेकरून ज्येष्ठ नागरिकांना त्यांच्या नजीकच्या ठिकाणाहून लसीकरणासाठी जाता येईल.

नागरिकांकडून येणाऱ्या सूचना लक्षात घेता, यापुढील काळात 25 वर्षावरील ज्यांना सहव्याधी (co-morbid) आहेत, अशा नागरिकांनाही कोरोना लस उपलब्ध करुन द्यावी, अशी मागणी लवकरच राज्य सरकार केंद्र सरकारकडे करणार आहे, अशी माहिती उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिली. ते आज बारामतीत कोरोना आढावा बैठकीत बोलत होते.

कोव्हिड लस कोणाला द्यायची, हा निर्णय सर्वस्वी केंद्र सरकार घेत असतं. 1 एप्रिल पासून 45 वर्षांवरील नागरिकांना लस देण्यात येणार आहे. तरी 45 वर्षाखालील ज्यांना डायबिटीजसारख्या अन्य व्याधी आहेत, त्यांना कोरोना लस देण्यात यावी अशी मागणी राज्य सरकार केंद्र सरकारकडे करणार आहे.

मुख्यमंत्री पंतप्रधान मोदींना विनंती करणार

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे लवकरच व्हिडीओ कॉन्फरन्सिंगच्या माध्यमातून पंतप्रधानांना 25 वर्षावरील सहव्याधीग्रस्तांनाही लस उपलब्ध देण्याची विनंती करणार आहेत, अशी माहिती अजित पवार यांनी कोरोना आढावा बैठकीत दिली.

Related Articles

Back to top button