कोरोंना विशेष

बारामतीत आज आणखी 54 पाॅझिटीव्ह.दिवसभरात एकुण  160 जण कोरोनाच्या विळख्यात

बारामतीतील रुग्ण संख्या 8968 झालेली आहे

बारामतीत आज आणखी 54 पाॅझिटीव्ह.दिवसभरात एकुण  160 जण कोरोनाच्या विळख्यात

बारामतीतील रुग्ण संख्या 8968 झालेली आहे

बारामती वार्तापत्र

बारामतीत काल 600 जणांची तपासणी झाली होती परंतु त्यामधील 211 जणांचे अहवाल प्रलंबित होते. त्याचा अहवाल आज दुपारी आला. त्यामध्ये तब्बल 54 जण कोरोनाबाधित आढळून आले आहेत. त्यामुळे काल दिवसभरात झालेल्या तपासणीत बारामती तालुक्‍यात तब्बल 160 जण कोरोना बाधित आढळून आले आहेत.

काल प्रतिक्षेत असलेल्या 211 नमुन्यांचा अहवालात बारामती शहरातील 44 व ग्रामीण भागातील 10 असे एकूण 54 जणांचे अहवाल पॉझिटिव्ह आले असून, इतर तालुक्यातील चार जणांचे अहवाल पॉझिटिव्ह आलेले आहेत. त्यामुळे बारामतीतील रुग्ण संख्या 8 हजार 968 वर पोहोचली आहे. ही रुग्णसंख्या गेल्या दीड वर्षातील सर्वोच्च संख्या असून बारामती ने आता ही सर्वोच्च संख्या पार केली आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button