सातारा

‘बिग बॉस’ फेम अभिजीत बिचुकले यांनी पंढरपूर-मंगळवेढा पोटनिवडणुकीसाठी अपक्ष उमेदवार म्हणून अर्ज

लोकसभा निवडणुकीच्या वेळी उमेदवारी अर्ज दाखल करताना त्यांनी अनामत रक्कम म्हणून १२ हजार ५०० रुपयांची चिल्लर जिल्हाधिकाऱ्यांकडे जमा केली होती.

‘बिग बॉस’ फेम अभिजीत बिचुकले यांनी पंढरपूर-मंगळवेढा पोटनिवडणुकीसाठी अपक्ष उमेदवार म्हणून अर्ज

लोकसभा निवडणुकीच्या वेळी उमेदवारी अर्ज दाखल करताना त्यांनी अनामत रक्कम म्हणून १२ हजार ५०० रुपयांची चिल्लर जिल्हाधिकाऱ्यांकडे जमा केली होती.

बारामती वार्तापत्र रिपोर्ट

छोट्या पडद्यावरील ‘बिग बॉस’ या रिअॅलिटी शो मुळे प्रसिद्धीच्या झोतात आलेले सातारकर अभिजीत बिचुकले हे पंढरपूर मंगळवेढा विधानसभा मतदारसंघाच्या पोटनिवडणुकीत उतरले आहेत. बिचुकले यांनी अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. बिचुकले यांनी निवडणुकीच्या रिंगणात अचानक घेतलेल्या उडीमुळं रंगत वाढली आहे.

स्वत:ला कवी मनाचा नेता म्हणवून घेणाऱ्या अभिजीत बिचुकले यांनी आतापर्यंत अनेक निवडणुका लढवल्या आहेत. नगरसेवकापासून ते देशाच्या राष्ट्रपतीपदासाठीही त्यानं प्रयत्न केले आहेत. साताऱ्याचे खासदार उदयनराजे भोसले यांनाही त्यानं कित्येकदा खुलेआम आव्हान दिलं आहे. २०१९ च्या विधानसभा निवडणुकीत त्यांनी मुंबईतील वरळी मतदारसंघातून आदित्य ठाकरे यांच्या विरोधात अपक्ष उमेदवार म्हणून निवडणूक लढवली होती. या निवडणुकीत त्यांना अवघी १५० मतं मिळाली होती.

बिचुकले यांनी आतापर्यंत अनेक निवडणुका लढवल्या असल्या तरी त्यांना एकदाही यश आलेलं नाही. मात्र, तरीही हार न मानता त्याचे प्रयत्न सुरूच आहेत. ‘२०१९ चा मुख्यमंत्री मीच ठरवणार’, असं बेधडक वक्तव्यही त्यानं केलं होतं. त्यानंतर आता त्यांनी पंढरपूरमधून नशीब आजमावण्याचा निर्णय घेतला आहे.

लोकसभा निवडणुकीच्या वेळी उमेदवारी अर्ज दाखल करताना त्यांनी अनामत रक्कम म्हणून १२ हजार ५०० रुपयांची चिल्लर जिल्हाधिकाऱ्यांकडे जमा केली होती. त्यामुळंही ते चर्चेत आले होते.

उद्धव ठाकरेंना आवाहन

निवडणुकीचा अर्ज भरण्यासाठी ते एकटेच आले होते. शंका आल्यानं पोलिसांनी त्यांना अडवले असता मी उमेदवार असल्याचा खुलासा त्यांनी केला. त्यानंतर त्यांनी पत्रकारांशी त्यांनी संवाद साधला. ‘फोन टॅपिंग प्रकरणात पोलिसांवर कारवाई व्हायला हवी. उद्धवदादा तुम्ही कारवाई करा. आम्ही तुमच्या पाठीशी आहोत,’ अशी भूमिका त्यांनी यावेळी मांडली.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!

बारामती वार्तापत्र च्या ताज्या बातम्या "WhatsApp", व "Telegram" वर पाहण्यासाठी खालील लिंक ला क्लिक करा.

Join What's App

Join Telegram