पुणे फलटण डेमू रेल्वे सेवेला आजपासून सुरुवात
रेल्वे सर्वात स्वस्त वाहतुकीचा मार्ग आहे.
बारामती वार्तापत्र रिपोर्ट
भारतीय रेल्वेने महाराष्ट्राच्या सर्वांगीन विकासासाठी महत्वाचे पाऊल उचलले आहे. रेल्वे प्रशासनाने अत्यावश्यक सेवेतील लोकांच्या सोयीसाठी फलटण ते पुणे आणि परतीसाठी डेमू रेल्वे सेवा सुरु केली आहे. केंद्रीय मंत्री प्रकाश जावडेकर यांच्या हस्ते या डेमू ट्रेनचे उद्घाटन करण्यात आले आहे. कृषी उत्पादन आणि कंपन्यांमुळे फलटण ते पुणे आणि इतर शहरांमध्ये प्रवास करणाऱ्या नागरिकांची संख्या जास्त आहे. रेल्वे सर्वात स्वस्त वाहतुकीचा मार्ग आहे. या विशेष ट्रेनमुळे प्रवाशांच्या वेळ आणि पैशाची मोठी बचत होणार आहे.
ही ट्रेन फलटण ते पुण्याहून लोणंदमार्गे धावणार आहे.
फलटण- पुणे अनारक्षित डेमु गाडीची नियमित सेवा आजपासून सुरू झाली आहे. ही गाडी पुण्याहून सकाळी 5. 50 ला सुटल्यानंतर सकाळी 9.35 ला फलटणला पोहचेल. फलटणहून 11 वाजता निघल्यानंतर गाडी 12.20 ला लोणंद स्थानकावर थांबेल. लोणंदवरून दुपारी 3.00 वाजता गाडी सुटल्यानंतर दुपारी 4.35 वाजता फलटणला पोहचेल. त्यानंतर संध्याकाळी 6 वाजता ही गाडी फलटणवरून निघाल्यानंतर रात्री 21.35 वाजता पुण्यात पोहचणार आहे. रविवारी ही सेवा बंद राहील. जेजुरी खंडोबाच्या दर्शन वेळेत बदल; जाणून घ्या नवी वेळ
दरम्यान, या उद्धाटन सोहळ्यात प्रकाश जावडेकर यांच्यासह उपमुख्यमंत्री अजित पवार, पालकमंत्री बाळासाहेब पाटील, विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस, खासदार, उदयनराजे भोसले, खासदार वंदना चव्हाण, भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील, आमदार दीपक चव्हाण, आमदार सुनील कांबळे. नगराध्यक्षा नीता नेवसे उपस्थित असल्याची माहिती मिळत आहे.