पुणे

लॉकडाऊनमध्ये गेलेली नोकरी अन पबजी गेम खेळण्याचा लागलेला नाद आणि त्यातून आलेल्या नैराश्यातून एका इंजिनिअर तरुणाने आत्महत्या

ही घटना पुण्यातील कोंढवा खुर्दमध्ये उघडकीस आली आहे.

लॉकडाऊनमध्ये गेलेली नोकरी अन पबजी गेम खेळण्याचा लागलेला नाद आणि त्यातून आलेल्या नैराश्यातून एका इंजिनिअर तरुणाने आत्महत्या

ही घटना पुण्यातील कोंढवा खुर्दमध्ये उघडकीस आली आहे.

बारामती वार्तापत्र रिपोर्ट

लॉकडाऊनमध्ये गेलेली नोकरी अन पबजी गेम खेळण्याचा लागलेला नाद आणि त्यातून आलेल्या नैराश्यातून एका इंजिनिअर असलेल्या तरुणाने गळफास घेऊन आत्महत्या केली आहे. ही घटना पुण्यातील कोंढवा खुर्दमध्ये उघडकीस आली आहे. ऋषिकेश मारुती उमाप (वय 29) असं आत्महत्या केलेल्या तरुणाचं नाव आहे.

ऋषिकेश हा कोंढव्यातील कावेरी पार्क सोसायटीत आपल्या आई वडिलांच्या सोबत रहात होता. त्याचे वडील सरकारी नोकरीतून निवृत्त झाले आहेत. तर त्याचा एक भाऊ बंगळुरु येथे नोकरीस आहे.

सोमवारी रात्री तो नेहमीप्रमाणे झोपला होता. दुसऱ्या दिवशी सकाळी 10 वाजले तरीही दरवाजा न उघडल्यामुळे कुटुंबीयांनी त्याला जोरात आवाज सुद्धा दिल्या. तो दरवाजा उघडत नसल्याचे समजल्यावर दरवाजा तोडून आत प्रवेश केल्यावर ऋषिकेशने गळफास घेऊन आत्महत्या केल्याचे आढळून आले. या घटनेची माहिती कोंढवा पोलिसांना देण्यात आली आहे.

ऋषिकेश उमाप हा इंजिनिअर असून लॉकडाऊनमुळे कंपनी बंद पडल्याने त्याची नोकरी गेली होती. तेव्हापासून तो घरीच होता. रात्र-रात्र तो पबजी गेम खेळत असल्याचं सांगण्यात येतंय. रात्री तो त्याच्या खोलीत झोपायला गेला. सकाळी उशीरापर्यंत तो न उठल्याने घरच्यांनी दरवाजा वाजविला, पण आतून आवाज येत नसल्याने दरवाजा तोडून आत प्रवेश केला. तेव्हा त्याने गळफास घेतल्याचे आढळून आले. कोंढवा पोलिसांनी अकस्मित मृत्यू अशी नोंद केली आहे. या प्रकरणाचा अधिक तपास पोलीस करीत आहेत.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!

बारामती वार्तापत्र च्या ताज्या बातम्या "WhatsApp", व "Telegram" वर पाहण्यासाठी खालील लिंक ला क्लिक करा.

Join What's App

Join Telegram