इंदापूर

भिगवण ग्रामपंचायत खरेदी करणार प्लॅस्टिक कचरा

मासिक सभेत करण्यात आला ठराव

भिगवण ग्रामपंचायत खरेदी करणार प्लॅस्टिक कचरा

मासिक सभेत करण्यात आला ठराव

इंदापूर : प्रतिनिधी

शासन स्तरावरून ग्रामीण भागात प्लॅस्टिक मुक्त मोहिमे अंतर्गत विविध उपक्रम, विविध योजना राबविल्या जात आहेत. याचाच एक भाग म्हणून ‘प्लॅस्टिक मुक्त गाव’ हा अनोखा उपक्रम भिगवण ग्रामपंचायतीमार्फत आज दि. १ एप्रिल पासून राबविण्यात येत आहे.

या उपक्रमांतर्गत गावातील सर्व प्लास्टिक,यामध्ये प्लॅस्टिकच्या वस्तू, खेळणी, पिशव्या, बाटल्या, कचरा तसेच इतर साहित्य ग्रामपंचायती मार्फत खरेदी करण्यात येणार असून, यासंदर्भातील ठराव दि.३० मार्च रोजी झालेल्या मासिक सभेत करण्यात आला आहे.

प्लॅस्टिक ग्रामपंचायतीकडून साधारणत: पाच ते दहा रुपये किलो या दराने खरेदी केले जाणार आहे. नागरिकांनी प्लॅस्टिकचा कचरा इतरत्र कुठेही न टाकता तो आपल्या घरामध्ये साठवून ठेवून ग्रामपंचायत कार्यालयामध्ये महिन्यातून दोन वेळा जमा करायचा आहे. इंदापूर तालुक्यातील भिगवणची बाजारपेठ मोठी असून या ठिकाणी उद्योग व व्यवसायही मोठ्या प्रमाणावर असल्याकारणाने येथे प्लॅस्टिकचा कचरा मोठ्या प्रमाणात होत आहे.त्यामुळे अशा स्वरूपाचा स्तुत्य उपक्रम ग्रामपंचायतीकडून राबविण्यात येत असून अन्य ग्रामपंचायतींनी सुद्धा त्यातून प्रेरणा घेण्याची गरज आहे.

सदरील उपक्रम ग्रामपंचायत सरपंच, उपसरपंच, सर्व सदस्य व ग्रामसेवक यांच्या संकल्पनेतून राबविण्यात आला असून नागरिकांनी प्लास्टिक, ग्रामपंचायत कार्यालयामध्ये जमा करण्याचे आवाहन ग्रामपंचायत प्रशासनाच्या वतीने करण्यात आले आहे.

Related Articles

Back to top button