प्रा.जोगेंद्र कवाडे यांनी नाकारला संजय सोनवणे यांचा राजीनामा
मुंबई येथील पक्ष कार्यालयात झाली बैठक
प्रा.जोगेंद्र कवाडे यांनी नाकारला संजय सोनवणे यांचा राजीनामा
मुंबई येथील पक्ष कार्यालयात झाली बैठक
इंदापूर : प्रतिनिधी
पीपल्स रिपब्लिकन पक्षाचे पश्चिम महाराष्ट्राचे युवक आघाडीचे अध्यक्ष संजय सोनवणे हे पक्ष वाढीसाठी काम करत असताना इतर जिल्ह्यातील नेतेमंडळी मात्र कामात हस्तक्षेप करत असल्याचा आरोप सोनवणे यांनी केला होता व इंदापूर येथे कार्यकर्त्यांची बैठक घेत राजीनामा देण्याचा निर्णय घेतला होता.
दरम्यान संजय सोनवणे यांनी दि.७ रोजी मुंबई येथील पक्ष कार्यलयात कार्यकर्त्यांसमवेत राजीनाम्या संदर्भात पक्षाच्या अध्यक्षांची भेट घेतली असता पक्षश्रेष्ठींनी सोनवणे यांचा राजीनामा नाकारला असून पक्षातील जे नेते मंडळी हस्तक्षेप करत आहेत त्यांना योग्य असा समझ देण्याचे स्पष्ट केले. यावेळी पीआरपी चे राष्ट्रीय कार्याध्यक्ष जयदीप कवाडे हे प्रामुख्याने पक्ष कार्यालयात उपस्थित राहून सोनवणे यांनी राजीनामा देऊ नये म्हणून उपस्थित होते.यावेळी त्यांनी सोनवणे यांसह कार्यकर्त्यांची समजूत काढली.
प्रसंगी संजय सोनवणे यांनी भविष्यात देखील पीपल्स रिपब्लिकन पक्षाचे अध्यक्ष प्रा.जोगेंद्र कवाडे सर यांच्या नेतृत्वाखाली काम करणार असून पश्चिम महाराष्ट्रात युवकांचे संघटन वाढवणार असल्याचे स्पष्ट केले.
यावेळी पीआरपीचे युवा आघाडीचे
पुणे जिल्हाध्यक्ष अमित सोनवणे, सोलापूर जिल्हाध्यक्ष लखन भंडारे,सांगली जिल्हाध्यक्ष महेंद्र गाडे,रायगड जिल्हाध्यक्ष सचिन तांबे यांसह पंढरपूर तालुकाध्यक्ष महेंद्र जाधव,माढा तालुकाध्यक्ष विनोद सरवदे तसेच महाराष्ट्रातील अनेक प्रमुख नेते मंडळींनी संजय सोनवणे यांनी राजीनामा देऊ नये यासाठी प्रयत्न केले अनेकांनी पक्ष सोडून नये म्हणून विनंती केली.