धक्कादायक प्रकार ‘या’ जिल्ह्यात पेट्रोलची पाइपलाइन फोडून तब्बल दोन हजार लिटर पेट्रोल चोरीला: आता विहीरीच पेट्रोलने भरल्या
सुदैवाने या घटनेत कोणतीही मोठी दुर्घटना झाली नाही.
धक्कादायक प्रकार ‘या’ जिल्ह्यात पेट्रोलची पाइपलाइन फोडून तब्बल दोन हजार लिटर पेट्रोल चोरीला: आता विहीरीच पेट्रोलने भरल्या
सुदैवाने या घटनेत कोणतीही मोठी दुर्घटना झाली नाही.
सातारा, बारामती वार्तापत्र रिपोर्ट
सध्या पेट्रोलचे दर आकाशाला टेकले आहेत. दरम्यान आता साताऱ्यातील सासवड मध्ये एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे. चोरट्यांनी पेट्रोल चोरीसाठी चक्क पेट्रोल वाहून नेणारी उच्च दाबाची पाइपलाइनच फोडली आणि तब्बल दोन हजार लिटर पेट्रोल लंपास करण्यात आलं. मुंबई-पुणे-सोलापूर मार्गावरील हिंदुस्थान पेट्रोलियमच्या २२३ किलोमीटरच्या पाइपलाइनला साताऱ्यातील सासवड गावाजवळ मोठं बिळ पाडून हिंदुस्थान पेट्रोलियमच्या अधिकाऱ्यांनी रात्री उशिरा घटनास्थळी धाव घेत बिळ बंद करण्याचा प्रयत्न केला. सुदैवाने या घटनेत कोणतीही मोठी दुर्घटना झाली नाही.
परंतु, पाइपलाइन फोडल्यामुळे पेट्रोल मोठ्या प्रमाणात वाहून गेलं आणि त्यामुळे लाखो रुपयांचं हजारो लिटर पेट्रोल जमिनीत मुरल गेलं आणि परिणामी या भागात असलेल्या विहिरी पेट्रोलनी भरून गेल्या. या सर्व घटनेमुळे अनेक एकर शेतातील उभ्या पिकांचे जमिनीत मुरलेल्या पेट्रोलमुळे मोठ्या प्रमाणावर नुकसान तर झालच शिवाय त्या भागातील विहिरीतील मासे आणि बेडूक, तसंच परिसरातील साप मृत झाले. तेव्हा हा प्रकार सर्वांसमोर उघडकीस आला.
मात्र एव्हढी मोठी घटना घडून सुद्धा पीक आणि प्राण्यांचे नुकसान होऊन सुद्धा त्या भागातील कोणताही मोठा अधिकारी अद्यापही या भागात फिरकला सुद्धा नसल्याचं लोक म्हणत आहेत. घडल्या प्रकरणी पोलीस ठाण्यात अज्ञातांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मात्र अजूनतरी याप्रकरणी कोणालाही अटक करण्यात आलेली नाही.