बारामती शहर पोलीस स्टेशन हदीत हॉटेलमध्ये खंडणी मागणारे टोळीविरूध्द मोका अतंर्गत कारवाई
तु मला ओळखत नाहीस का? माझे पुण्यात भाई लोकांशी संबध आहेत.
बारामती शहर पोलीस स्टेशन हदीत हॉटेलमध्ये खंडणी मागणारे टोळीविरूध्द मोका अतंर्गत कारवाई
तु मला ओळखत नाहीस का? माझे पुण्यात भाई लोकांशी संबध आहेत.
बारामती वार्तापत्र
हॉटेल व्यावसायिकाला मारहाण करून खंडणी मागणार्या टोळी विरुद्ध बारामतीत मोक्कांतर्गत कारवाई करण्यात आली आहे. टोळीने बारामती शहर व परिसरात खून, खुनाचा प्रयत्न, जबरी चोरी, दरोडा, खंडणी अशा स्वरूपाचे १३ गुन्हे संघटिपणे केल्याचे निष्पन्न झाले आहे. नितिन बाळासो तांबे (रा.पाहुणेवाडी ता.बारामती जि.पुणे), अमिन दिलावर इनामदार (रा.कसबा बारामती जि.पुणे), गणेश संजय बोडरे (रा.बारामती ता. बारामती जि. पुणे) व अनोळखी २ इसम यांच्यावर मोक्कांतर्गत कारवाई करण्यात आली आहे.
फिर्यादी हे बारामती शहरातील फलटण रोडवरील त्यांच्या स्नेहा गार्डन या हॉटेलवर असताना आरोपी हॉटेलमध्ये आले. नितीन तांबे हा फिर्यादीस म्हणाला की ‘मी एन टी भाई आहे. तू मला ओळखत नाहीस का? माझे पुण्यात भाई लोकांशी संबंध आहेत. तुला हॉटेल नीट चालवायचे असेल तर दर महिन्याला माझा माणूस येईल. त्याच्याकडे २५ हजार रूपये दे. नाहीतर मी स्वत: येईन’ असे म्हणून दमदाटी केली.
यांनी केली कारवाई…….
आरोपींवर मोक्कांतर्गत कारवाई करण्यासाठी कोल्हापूर परिक्षेत्राचे विशेष पोलीस महानिरीक्षक मनोज लोहीया यांच्याकडे प्रस्ताव पाठवण्यात आला होता. त्यानुसार वरील आरोपींवर मोक्कांतर्गत कारवाई करण्यात आली आहे. सदर गुन्हयाचा तपास उपविभागीय पोलिस अधिकारी नारायण हे करीत आहेत. सदरची कारवाई ही डॉ.अभिनव देशमुख,पोलीस अधिक्षक, पुणे ग्रामीण, मिलींद मोहीते,अपर पोलीस अधिक्षक,बारामती विभाग बारामती,नारायणशिरगावकर,उपविभागीय पोलीस अधिकारी,बारामती विभाग बारामती, बारामती शहर पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक नामदेव शिंदे, सपोनि मुकुंद पालवे, पोलीस अंमलदार अविनाश दराडे,अतुल जाधव,अंकुश दळवी यांनी केली.
१८ टोळ्यांवर मोक्कांतर्गत कारवाई….
सदर कारवाई बद्दल पोलीस अधिक्षक,पुणे ग्रामीण यांनी १५ हजार रूपयांचे बक्षीस जाहीर केले आहे. उपविभागीय पोलिस अधिकारी नारायण शिरगावकर यांनी पदभार स्वीकारल्यापासून १८ गुन्हेगारी टोळयांविरूध्द १८ मोक्कांतर्गत गुन्हे दाखल केले. त्यामध्ये १२० आरोपी अटक केले आहेत.