स्थानिक

यंदाही भाविकांविना रामनवमी साजरी, बारामतीतील श्री राम नगर भिगवण रोड येथील मंदिरात राम नवमी उत्साहात साजरी

10 वर्षांपासून मंदिरात साजरी होते रामनवमी

यंदाही भाविकांविना रामनवमी साजरी, बारामतीतील श्री राम नगर भिगवण रोड येथील मंदिरात राम नवमी उत्साहात साजरी

10 वर्षांपासून मंदिरात साजरी होते रामनवमी

बारामती वार्तापत्र

बारामतीतील श्री राम नगर भिगवण रोड येथील मंदिरात राम नवमी उत्साहात साजरी करण्यात आली. या वेळी कोरोनाचे संकट लवकरात लवकर दूर व्हावे यासाठी प्रभू श्रीराम चरणी साकडे देखील घातले गेले.

श्री राम नगर येते कै ह भ प भगवानराव बाबुराव तावरे ( आबा )श्रीरामावर त्यांची अढळ श्रद्धा त्यातून त्यांनी स्वखर्चाने श्री राम मंदिराची 1995 पाया भरणी करून 2012 साली मंदिर उभारून अतिशय भक्तीपूर्ण वातावरणात दरवर्षी श्रीरामनवमी इतर धार्मिक कार्यक्रम आयोजित करून बारामतीकरांना सुश्राव्य कीर्तनाचा आणि भजनाचा आंनद देत आले .

यावेळी त्यांच्या चेहऱ्यावरील उदंड उत्साह आणि समर्पण अवर्णनीय असा असायचा , त्यांची श्रीराम वर अढळ श्रद्धा आणि भक्ती .होती त्यांची ही मांदियाळी निश्चित फुढे चालू राहीली .

यावर्षी त्याच्या अनुपस्थित त्यांच्या वंशज यांनी परंपरा नुसार आज मंदिरात रामनवमी सर्व शासकीय नियम पळून साजरी केली . मंदिरात पाळणा बंदला होता 12 वाजता फुले टाकून राम जन्म झाला .

सदर मंदिरात गुडी पाडवा पासून दर रोज काकड आरती संद्याकाळी हरि पाठ व जागर असा 9 दिवस कार्यक्रम झाले सकाळी श्रीराम लक्षमन सीता हनुमान यांना पूर्ण अभिषेक करण्यात आला .

देशभरात रामनवमी उत्सव मोठ्या उत्साहात साजरा केला जातो. मात्र, गेल्या वर्षाप्रमाणेच यंदाचा रामनवमीचा उत्सव कोरोनाच्या सावटात साजरा केला जात आहे. बारामतीतील श्री राम नगर भिगवण रोड येथील राममंदिरात घरातील महिलांनी एकत्र येत रामनवमी उत्सव साजरा केला. कोरोनाचे संकट लवकरात लवकर दूर व्हावे यासाठी प्रभू श्रीराम चरणी साकडे देखील घातले.

10 वर्षांपासून मंदिरात साजरी होते रामनवमी –

बारामतीतील श्री राम नगर भिगवण रोड येथील राम मंदिरात 10 वर्षांपासून रामनवमी साजरी होत आहे. दरवर्षी मोठ्या उत्साहात राम नवमी साजरी केली जाते. धार्मिक कार्यक्रमांसह श्री राम जन्मोत्सव देखिल मोठ्या उत्साहात साजरा होत असतो. मात्र, मागील दोन वर्षांपासून कोरोनाच्या पाश्वभूमीवर लावण्यात आलेल्या निर्बंधांमुळे भाविकांविनाच मोजक्याच लोकांच्या उपस्थितीत रामनवमी साजरी केली जात आहे.

ठिकठिकाणी नियमांचे पालन करत राम नवमी उत्साहात साजरी –

राज्यात सध्या कोरोनाच्या दुसऱ्या लाटेने थैमान घातले आहे. दरोरोज कोरोनाबधितांची संख्या नवनवे उच्चकं गाठत आहे. त्यामुळे कोरोनाच्या वाढत्या प्रदूर्भावामुळे राज्यात अनेक कठोर निर्बंध लादण्यात आले आहेत. अशातच  साजऱ्या केल्या जाणाऱ्या राम नवमी उत्सवासाठीही शासनाकडून नियमावली जाहीर करण्यात आली आहे. या नियमांचे पालन करत कोरोनाच्या सावटात बारामतीतील ठिकठिकाणी राम नवमी उत्साहात पार पडली.

सदर राम जन्म सोहळा अत्यन्त भक्ती मय वातावरनात श्री पांडुरंग तावरे , श्री बाळासाहेब तावरे , श्री ज्ञानेश्वर तावरे ,आडवोकेट हरीश तावरे त्यांचे कुटुंबीय व मार्गदर्शक ह भ प मोहन नाना निकम , ह भ प अशोक घाडगे मंदिराचे पुजारी श्री सचिन क्षीरसागर व श्रीराम भक्त भाविक यांच्या उपस्थिती मध्ये साजरा झाला.

Related Articles

Back to top button