दिलासादायक ! बारामतीत आणखी एक नविन प्रयोग.. व्हेंटीलेटरला शोधला बेन सर्किट चा पर्याय.. आता केवळ व्हेंटीलेटरविना होणार नाही रुग्णांची हेळसांड..
हे उपकरण सुरू केल्यानंतर रुग्णाचा 80 ते 85 पर्यंत असणारा ऑक्सिजन 90 ते 95 पर्यंत वाढतो
दिलासादायक ! बारामतीत आणखी एक नविन प्रयोग.. व्हेंटीलेटरला शोधला बेन सर्किट चा पर्याय.. आता केवळ व्हेंटीलेटरविना होणार नाही रुग्णांची हेळसांड..
हे उपकरण सुरू केल्यानंतर रुग्णाचा 80 ते 85 पर्यंत असणारा ऑक्सिजन 90 ते 95 पर्यंत वाढतो
बारामती वार्तापत्र
ऑक्सिजनच्या तुटवड्याच्या काळात केलेल्या या अभिनव प्रयोगामुळे कोरोना रुग्णांचा ‘श्वास’ वाढवण्यासाठी मोलाची मदत झाली आहे. शस्त्रक्रियेवेळी भूलशास्त्रात रुग्णांना भूल देण्याकरिता बेन सर्किटचा (bain circuit) वापर केला जातो. साधारणपणे दीड हजार ते दोन हजार रुपये किमतीच्या या उपकरणाने ऐन संकटाच्या काळात कोरोना रुग्णांना दिलासा मिळू शकतो हे या प्रयोगाने दाखवून दिले आहे.
बारामतीतील आरोग्य हॉस्पिटल चे प्रमुख डॉक्टर राहुल जाधव, भूलतज्ञ डॉ. सुजित अडसूळ यांना ऑक्सिजनच्या तुटवड्याच्या काळात अचानक या प्रयोगाची संकल्पना सुचली आणि हा प्रयोग सहजपणे अस्तित्वात आला. साधारणपणे शस्त्रक्रियेच्या वेळी भूल देताना बेन सर्किट चा उपयोग केला जातो.
ऑक्सीजनचा तुटवडा असण्याच्या काळात व्हेंटिलेटरपेक्षा कमी ऑक्सीजन वापरून तेवढ्याच ऑक्सिजनमध्ये व्हेंटिलेटर प्रमाणेच ऑक्सिजनची मात्रा वाढविण्याचे काम हे उपकरण करू शकते. याची कल्पना आल्याने डॉ. जाधव यांनी या उपकरणाचा वापर करून पाहिला आणि त्याचे परिणाम देखील चांगले मिळत गेले. गेल्या एक ते दीड आठवड्यापासून आरोग्य हॉस्पिटलमध्ये याचे प्रयोग केले जात होते. हे उपकरण सुरू केल्यानंतर रुग्णाचा 80 ते 85 पर्यंत असणारा ऑक्सिजन 90 ते 95 पर्यंत वाढतो हे त्यातून दिसून आले.