इंदापूर

राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे यांच्या मदतीने रशियात मृत्यू झालेल्या भारतीय तरुणाचा मृतदेह इंदापूरमध्ये आणणे शक्य झाले 

तन्मय आबासाहेब बोडके (वय 22, रा. पिंपरी बुद्रुक, ता. इंदापूर) असं या विद्यार्थ्याचं नाव आहे. तो रशियामध्ये एमबीबीएसच्या तिसऱ्या वर्षाला होता.

राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे यांच्या मदतीने रशियात मृत्यू झालेल्या भारतीय तरुणाचा मृतदेह इंदापूरमध्ये आणणे शक्य झाले

तन्मय आबासाहेब बोडके (वय 22, रा. पिंपरी बुद्रुक, ता. इंदापूर) असं या विद्यार्थ्याचं नाव आहे. तो रशियामध्ये एमबीबीएसच्या तिसऱ्या वर्षाला होता.

इंदापूर ; बारामती वार्तापत्र

रशियामध्ये वैद्यकीय शिक्षण घेण्यासाठी गेलेल्या भारतीय तरुणाचा तिकडेच अकाली मृत्यू झाला. मात्र निधन झालेल्या इंदापूर तालुक्यातील या विद्यार्थ्याचा मृतदेह भारतात आणण्याचा मोठा प्रश्न उपस्थित झाला. अखेर राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे यांच्या मदतीने तरुणाचा मृतदेह इंदापूरमध्ये आणणे शक्य झाले. वैद्यकीय शिक्षण घेत असलेल्या या तरुणाचा 21 एप्रिल रोजी कर्करोगामुळे निधन झालं होतं.

तन्मय आबासाहेब बोडके (वय 22, रा. पिंपरी बुद्रुक, ता. इंदापूर) असं या विद्यार्थ्याचं नाव आहे. तो रशियामध्ये एमबीबीएसच्या तिसऱ्या वर्षाला होता. रशियामधील निझनी नोवागोर्ड विद्यापीठात तो शिकत होता. अचानक वजन वाढत जाऊन त्याला चालणेही मुश्किल झाले. त्यामुळे रुग्णालयात तपासणी केली असता त्याला कर्करोग झाल्याचे लक्षात आले. त्यासाठी शस्त्रक्रिया चालू असताना रक्तदाब कमी होऊन त्याचे निधन झाले, अशी माहिती मृत तन्मयचे निकटवर्तीय श्रीकांत बोडके यांनी दिली.

रशियाच्या राजदुतांपासून निझनी विद्यापीठांपर्यंत सुप्रिया सुळेंचा पाठपुरावा

भारतात सध्या कोरोनाच्या साथीने थैमान घातले आहे. महाराष्ट्रात तर अत्यावश्यक सेवा वगळता सर्वच प्रकारच्या वाहतुकीवर निर्बंध घालण्यात आले आहेत. अशा परिस्थितीत परदेशात निधन झालेल्या तन्मयचे पार्थिव विमानाने भारतात आणून त्याच्या मूळ गावापर्यंत पोहोचवणे मोठे जिकिरीचे होते. ही बाब श्रीकांत बोडके यांनी खासदार सुप्रिया सुळे यांच्या लक्षात आणून दिली. त्यानुसार सुळे यांनी परराष्ट्र व्यवहार मंत्री जयशंकर, रशियाचा भारतातील दूतावास, तेथील निझनी विद्यापीठ प्रशासन यांच्याशी सातत्याने पाठपुरावा करत तन्मय याचे पार्थिव भारतात आणण्यासाठी प्रयत्न केले.

परराष्ट्र मंत्री जयशंकर यांच्यासह यंत्रणेचे सुप्रिया सुळेंकडून आभार व्यक्त

या प्रयत्नांना अपेक्षित यश येऊन अखेर 29 एप्रिल रोजी मुंबई येथील आंतरराष्ट्रीय विमानतळावर त्याचा मृतदेह आणण्यात आला. दरम्यानच्या कालावधीत सुप्रिया सुळे या सातत्याने बोडके कुटुंबियांच्या संपर्कात होत्या. त्यांना सतत आधार देत इकडे दोन्ही देशांच्या प्रशासनाशीही त्या पाठपुरावा करत होत्या. अखेर मृतदेह मुंबईत दाखल झाल्यानंतर सुळे यांनी परराष्ट्र मंत्री जयशंकर, रशियन दूतावास आणि अन्य शासकीय यंत्रणांचे आभार मानले.

बोडके कुटुंबाकडून कृतज्ञता व्यक्त

तन्मयचे पार्थिव मुंबईहून रुग्णवाहिकेतून इंदापूर तालुक्यात पिंपरी बुद्रुक या त्याच्या मूळ गावी आणल्यानंतर शुक्रवारी (30 एप्रिल) सकाळी त्याच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले. अत्यंत अडचणीच्या प्रसंगी खासदार सुप्रिया सुळे यांनी केलेल्या या मदतीमुळे तन्मयचे पार्थिव आणता आले, अशी भावना बोडके कुटुंबाने व्यक्त केलीय. तसेच त्यांनी सुप्रिया सुळे यांचे आभार मानलेत.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!

बारामती वार्तापत्र च्या ताज्या बातम्या "WhatsApp", व "Telegram" वर पाहण्यासाठी खालील लिंक ला क्लिक करा.

Join What's App

Join Telegram