क्राईम रिपोर्ट

कोरोना काळात लॉकडाऊन सुरू असतानाही पुण्यातील गुन्हेगारी कमी झालेली नसल्याचे चित्र, मध्यवर्ती परिसरात फौजदाराचा खून; संशयित आरोपी पोलिसांच्या ताब्यात

बुधवारपेठ परिसरात असलेल्या श्रीकृष्ण टॉकीजजवळ सय्यद यांचा खून करण्यात आला

पुणे : कोरोना काळात लॉकडाऊन सुरू असतानाही पुण्यातील गुन्हेगारी कमी झालेली नसल्याचे चित्र आहे. काल मध्यरात्री फरासखाना पोलीस ठाणे परिसरात  खून झाल्याची घटना समोर आली आहे. सहाय्यक फौजदार समीर सय्यद यांचा खून झाला आहे. संशयीत आरोपींना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.

पुण्यातील बुधवार पेठ परिसरात मध्यरात्री तडीपार गुंड प्रवीण महाजनने फरासखाना पोलीस ठाण्यातील सहाय्यक उपनिरिक्षक समीर सय्यद यांचा खून केल्याने एकच खळबळ उडाली आहे. पोलिसांना महाजनला ताब्यात घेतले आहे.

बुधवारपेठ परिसरात असलेल्या श्रीकृष्ण टॉकीजजवळ सय्यद यांचा खून करण्यात आला. खून का करण्यात आला त्याचे कारण अद्याप अस्पष्ट आहे. सय्यद यांचा मृतदेह शवविच्छेदनासाठी शासकीय रुग्णालयात पाठवण्यात आला आहे.

महाजन हा तडीपार गुंड असून तो, शस्त्र घेऊन शहराच्या मध्यवस्तीत कसा पोहचला. तोपर्यंत पोलीस प्रशासनाचे त्याच्यावर लक्ष नव्हते का? असे अनेक प्रश्न उपस्थित होत आहेत. या घटनेचा पुढील तपास सुरू आहे.

Back to top button