
पुन्हा एकदा माजी सैनिक ‘कोरोना’ च्या लढाईत सामील
बारामती पोलिसांच्या मदतीला माजी सैनिक
बारामती वार्तापत्र
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर व लॉक डाऊन मधील बंदोवस्त साठी बारामती पोलीसाच्या मदतीला माजी सैनिक पुढे सरसावले आहेत.
जय जवान माजी सैनिक संघटना चे तीस माजी सैनिक गेल्या वर्षी सारखे या वर्षी सुद्धा लॉकडाऊन मधील बंदोवस्त करण्यासाठी नेमून दिलेल्या विविध चेक पॉइंट वर रुजू झाले आहेत.पोलीसा च्या खांद्याला खांदा लावून बारामती शहरातील विविध चेक पॉईंट वर नागरिक ची ओळखपत्र तपासणे ,वाहन चालकाची लायसन्स,ओळखपत्रे तपासणे ,तपासणी नाक्यावर बॅरिकेट टाकणे,आदी सर्व कामे नेमून दिलेल्या वेळेत ,लष्करी गणवेशात करणे ही कामे निःशुक्ल माजी सैनिक देश सेवा म्हणून करीत आहेत.
” 2020 च्या लॉकडाऊन मध्ये उत्कृष्ट काम केल्यावर या वर्षी सुद्धा लॉकडाऊन मध्ये माजी सैनिक आनंदाने समाज्याची सेवा करीत आहेत लष्करी सेवेत असताना देशाच्या विविध भागात लष्करी गणवेश मध्ये सेवा केली आता पुन्हा एकदा समाज्याची सेवा पोलिसांच्या मदतीने आपल्याच जन्मभूमीत तालुक्यात करताना समाधान प्रत्येक माजी सैनिकास होत आहे” अशी माहिती जय जवान माजी सैनिक संघटनेचे अध्यक्ष हनुमंत निबाळकर यांनी दिली.
ज्येष्ठ नगरसेवक किरण गुजर, उपविभागीय पोलीस अधिकारी नारायण शिरगावकर, बारामती शहर पोलीस निरीक्षक नामदेव शिंदे आदी नि सदर संधी उपलब्ध करून दिली व मार्गदर्शन केले.