सर्वोच्च न्यायालयाने मराठा आरक्षण रद्द केल्याने भाजपचे; खासदार उदयनराजे भोसले आक्रमक
लोकप्रतिनिधींना घराबाहेर पडू देऊ नका, रस्त्यातच आडवा
सर्वोच्च न्यायालयाने मराठा आरक्षण रद्द केल्याने भाजपचे ; खासदार उदयनराजे भोसले आक्रमक
लोकप्रतिनिधींना घराबाहेर पडू देऊ नका, रस्त्यातच आडवा
बारामती वार्तापत्र रिपोर्ट
सर्वोच्च न्यायालयाने मराठा आरक्षण रद्द केल्याने भाजपचे खासदार उदयनराजे भोसले आक्रमक झाले आहेत. लोकप्रतिनिधांना घराबाहेर पडू देऊ नका, त्यांना रस्त्यातच आडवा, असे आदेशच उदयनराजे यांनी मराठा बांधवांना दिले आहेत. उदयनराजे यांनी मराठा बांधवांना उघडपणे चिथावणी दिल्याने आगामी काळात मराठा आरक्षणाचा विषय अधिक तापण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.
सर्वोच्च न्यायालयाने मराठा आरक्षणाचा कायदा रद्द ठरवला आहे. त्यानंतर पहिल्यांदाच छत्रपती उदयनराजे भोसले यांनी प्रतिक्रिया व्यक्त केली आहे. हा सर्वोच्च न्यायालयाचा निकाल जरी असला तरी राज्य सरकारने मराठा आरक्षणाबाबत आपली जबाबदारी स्वीकारली पाहिजे. वेगवेगळ्या पक्षातील ज्येष्ठ नेत्यांनी आतापर्यंत आपली भूमिका का स्पष्ट मांडली नाही?, असा संतप्त सवाल उपस्थित करत उदयनराजे यांनी नाव न घेता राष्ट्रवादीचे नेते शरद पवार यांना टोला लगावला आहे. मराठा समाजाने यापुढे आंदोलन करू नये, त्यापेक्षा निवडून दिलेल्या लोकप्रतिनिधीना रस्त्यात आडवा आणि घरातून बाहेर फिरू देऊ नका, असा आदेश मराठा समाजाला दिला आहे.