पुणे प्रशासनाने लॉकडाऊन कडक करण्याचा निर्णय,दुपारी 12 नंतर प्रत्येक वाहनाची कडक तपासणी
तिसऱ्या लाटेपूर्वीच पुण्यात लहान मुलांना कोरोनाचा संसर्ग झाला आहे

पुणे प्रशासनाने लॉकडाऊन कडक करण्याचा निर्णय,दुपारी 12 नंतर प्रत्येक वाहनाची कडक तपासणी
तिसऱ्या लाटेपूर्वीच पुण्यात लहान मुलांना कोरोनाचा संसर्ग झाला आहे
पुणे :बारामती वार्तापत्र रिपोर्ट
पुण्यातील कोरोनाचा प्रादुर्भाव काहीसा कमी होताना दिसत असला तरी रुग्णसंख्येतील वाढ अजूनही हजाराच्या घरात आहे. त्यामुळे पुणे प्रशासनाने पुण्यातील लॉकडाऊन अधिक कडक करण्याचा निर्णय घेतला आहे. पुण्यात लोक मोठ्या प्रमाणात घराबाहेर पडत असल्याचं चित्र पाहायला मिळत आहे. त्या पार्श्वभूमीवर पुणे प्रशासनाने लॉकडाऊन कडक करण्याचा निर्णय घेतलाय. त्यानुसार मंगळवारपासून दुपारी 12 नंतर पुण्यातील रस्त्यांवर शुकशुकाट पाहायला मिळेल अशी अपेक्षा आहे.
मंगळवारपासून पुण्यातील लॉकडाऊन कडक करण्यात येणार आहे. त्यामुळे नागरिकांनी आवश्यकता असेल तरच घरातून बाहेर पडावं, असं आवाहन पुणे पोलिसांनी केलंय. दुपारी 12 वाजल्यानंतर रस्त्यावर येणाऱ्या प्रत्येक वाहनाची कडक तपासणी केली जाणार आहे. उच्च न्यायालयाने दिलेल्या निर्देशानुसार पुणे पोलिसांनी कडक कारवाईचे संकेत दिले आहेत. पुणे पोलीस आयुक्त अमिताभ गुप्ता यांनी ही माहिती दिली आहे.