काँग्रेसचे राज्यसभेचे खासदार राजीव सातव यांचे कोरोना संसर्गनंतर उपचारादरम्यान निधन

19 एप्रिलपासून राजीव सातव यांना कोरोनाची लक्षणं जाणवत होती.

काँग्रेसचे राज्यसभेचे खासदार राजीव सातव यांचे कोरोना संसर्गनंतर उपचारादरम्यान निधन

19 एप्रिलपासून राजीव सातव यांना कोरोनाची लक्षणं जाणवत होती.

बारामती वार्तापत्र रिपोर्ट

 काँग्रेसचे राज्यसभेचे खासदार राजीव सातव यांचे कोरोना संसर्गनंतर उपचारादरम्यान निधन झाले. गेल्या काही दिवसांपासून ते कोरोनाशी झुंज देत होते. मात्र त्यांची ही झुंज अपयशी ठरली. पुण्यातील जहांगीर हॉस्पिटलमध्ये राजीव सातव यांनी अखेरचा श्वास घेतला.कॉंग्रेस सरचिटणीस रणदीपसिंग सुरजेवाला यांनी ट्वीट करत याबाबतची माहिती दिली.

कोरोनाची लक्षणे 

19 एप्रिलपासून राजीव सातव यांना कोरोनाची लक्षणं जाणवत होती. 22 तारखेला त्यांचा रिपोर्ट कोरोना पॉझिटिव्ह आला. पुण्यात जहांगीर हॉस्पिटलमध्ये त्यांच्यावर 23 एप्रिलपासून आयसीयूमध्ये उपचार सुरु आहेत. 28 तारखेपासून ते व्हेंटिलेटरवर आहेत. त्यांची इच्छाशक्ती चांगली आहे, ते उपचाराला प्रतिसाद देत आहेत, अशी माहिती काँग्रेस नेते आणि मंत्री विश्वजीत कदम यांनी काही दिवसांपूर्वी दिली होती.

22 एप्रिल रोजी कोरोनाची लागण

कोरोनाची सौम्य लक्षणं जाणवत असल्याची माहिती राजीव सातव यांनी 22 एप्रिल रोजी ट्विटरवरुन दिली होती. आपल्याला कोरोनाची लागण झाली असून संपर्कातील सर्वांनी काळजी घेण्याचं आवाहन त्यांनी केलं होतं.

Back to top button