सणसर च्या सामाजिक कार्यकर्त्याने वाढदिवसानिमित्त जपली बांधिलकी, अनोख्या उपक्रमाचे जिल्हाभर कौतुक !
प्राथमिक आरोग्य केंद्रातील परिचारिकांना सॅनिटायझर,मास्क, उकडलेली अंडी व फळांचे वाटप करण्यात आले.

सणसर च्या सामाजिक कार्यकर्त्याने वाढदिवसानिमित्त जपली बांधिलकी, अनोख्या उपक्रमाचे जिल्हाभर कौतुक !
प्राथमिक आरोग्य केंद्रातील परिचारिकांना सॅनिटायझर,मास्क, उकडलेली अंडी व फळांचे वाटप करण्यात आले.
बारामती वार्तापत्र
सणसर.ता. इंदापुर येथील सामाजिक कार्यकर्ते व गेले चाळीस वर्षापासून सामाजिक कार्यात अग्रेसर असणा-या व महाराष्ट्र शासन रुपये 25000 रोख, प्रशस्तीपत्र व सन्मानचिन्ह तसेच वालचंदनगर पोलीस स्टेशनचा गणराया अवॉर्ड सारखे पुरस्कार मिळवणारे आझाद तरूण मंडळाचे संस्थापक अध्यक्ष व महाराष्ट्र शासन गुणवंत कामगार कल्याण पुरस्कार प्राप्त, श्री छत्रपती सहकारी साखर कारखान्यातील कॉम्प्युटर ऑपरेटर प्रकाश ज्ञानदेव शिंदे यांचे वाढदिवसा निमित्त येथे केक ऐवजी कलिंगड कापून,वृक्षारोपण रुग्णांना सॅनिटायझर, मास्क, उकडलेली अंडी व फळे वाटप करून विविध सामाजिक उपक्रम राबवून वाढदिवस साजरा करण्यात आला.
याप्रसंगी इंदापूर तालुका युवा सेनेचे माजी अध्यक्ष सोमनाथ उर्फ पिंटू गुप्ते ,इंदापूर तालुका शिवसेना उपप्रमुख विजय शिरसट, भाग्यलक्ष्मी सराफ चे जगदीश कांबळे, माध्यमिक शिक्षक सुमित निंबाळकर, सामाजिक कार्यकर्ते तानाजी उर्फ बाबा निंबाळकर, टेक्निकल विभागाचे निदेशक विजय शिंदे, रणजित राजेभोसले इत्यादी उपस्थित होते.
यावेळी वाढदिवसाला फळं कापून शेतकऱ्यांना मदत करा, केक ऐवजी कलिंगड, खरबूज , सफरचंद, पेरू ,पपई, सीताफळ,आंबा या फळांचा वाढदिवसाच्या निमित्ताने केक सारखाच वापर करा यामुळे शेतकऱ्यांच्या पिकाला बाजार मिळेल व शेतकरी आत्महत्या रोखायला मदत होईल. कारण दररोज असंख्य लोकांचे वाढदिवस साजरे होत असतात आणि या वाढदिवसाच्या निमित्ताने केक ची किंमत दोन तीनशे रुपये तरी सहज असते आणि यापैकी एकही फळ तीनशे रुपये किलो नाही तसेच आपल्या आरोग्यासाठी सुद्धा केक ऐवजी फळांचा वापर केला तर फळे ही निश्चितच आरोग्यदायी आहेत. वाढदिवसा दिनी अंधानुकीकरण करून जर पाश्चात्य देशातल्या संस्कृतीचा वापर करून देशाच्या संस्कृतीला बाधा आणीत असेल तर याचा तरूणांनी विचार केला पाहिजे. शहरांमध्ये असंख्य लोक केक वरती खर्च करतात, केमिकल युक्त व विविध रसायने युक्त केक तोंडाला लावतात, उरलेला केक फेकून देतात. परंतु जर वाढदिवसानिमित्त केक ऐवजी फळांचा वापर केला तर आपले मित्र जे आपला वाढदिवस साजरा करण्यासाठी आलेले असतात ते आरोग्यदायी फळांची चव आनंदाने चाखू शकतात आणि तुमच्या वाढदिवसाच्या निमित्ताने त्यांना उत्तम आरोग्यदायी आहार मिळू शकते. हा पण आजच्या युवकांनी कुठेतरी याचा विचार केला पाहिजे. असा सामाजिक संदेश याप्रसंगी देण्यात आला.
याप्रसंगी सणसर ग्रामपंचायत व प्राथमिक आरोग्य केंद्र यांचे संयुक्त विद्यमाने चालवण्यात आलेल्या विलगीकरण कक्षातील रुग्णांना व प्राथमिक आरोग्य केंद्रातील परिचारिकांना सॅनिटायझर,मास्क, उकडलेली अंडी व फळांचे वाटप करण्यात आले. तसेच येथील जानाईनगर वसाहतीमध्ये याप्रसंगी वृक्षारोपण करण्यात आले व उपस्थितांना फळांचे वाटप करण्यात आले . या नाविन्यपूर्ण उपक्रमाचे सर्व परिसरामध्ये स्वागत होत आहे