राज्यातील लॉकडाऊन अजून 15 दिवस वाढवण्यात आल्याची माहिती टोपे यांनी दिलीय. मात्र, त्याबाबतची नियमावली 1 जूनला जाहीर
खासगी रुग्णालयातील अवाजवी बिल आकारणीचा मुद्दा प्रकर्षाने समोर येत आहे.
राज्यातील लॉकडाऊन अजून 15 दिवस वाढवण्यात आल्याची माहिती टोपे यांनी दिलीय. मात्र, त्याबाबतची नियमावली 1 जूनला जाहीर
खासगी रुग्णालयातील अवाजवी बिल आकारणीचा मुद्दा प्रकर्षाने समोर येत आहे.
बारामती वार्तापत्र रिपोर्ट
राज्यातील कोरोनाचा प्रादुर्भाव काहीसा कमी होत आहे. या पार्श्वभूमीवर आज पुण्यात कोरोनाचा आढावा बैठक पार पडली. या बैठकीनंतर आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी महत्वाची घोषणा केलीय. राज्यातील लॉकडाऊन अजून 15 दिवस वाढवण्यात आल्याची माहिती टोपे यांनी दिलीय. मात्र, त्याबाबतची नियमावली 1 जूनला जाहीर केली जाईल. तर शिथिलतेबाबत जिल्हाधिकाऱ्यांना अधिकार असणार आहेत, अशी माहिती टोपे यांनी दिली आहे. दरम्यान, पुण्यातील कोरोनास्थिती सुधारत आहे. रुग्णसंख्या कमी होतेय. पण पॉझिटिव्हीटी रेट अद्याप कमी नाही. अशावेळी टेस्टिंगची संख्या कमी होता कामा नये, अशी सूचना टोपे यांनी प्रशासनाला केलीय.
खासगी रुग्णालयातील अवाजवी बिल आकारणीचा मुद्दा प्रकर्षाने समोर येत आहे. अशावेळी खासगी रुग्णालयाचं प्रत्येक बिल तपासलं जाणार असल्याची माहिती टोपे यांनी दिली आहे. यापूर्वी खासगी रुग्णालयातील दीड लाखाचं बिल तपासलं जात होतं. मात्र, आता खासगी रुग्णालयाचे प्रत्येक बिल तपासलं जाईल, असं टोपे यांनी जाहीर केलंय.