बारामतीत आयुर्वेदिक महाविद्यालय आणि १०० बेड चे रुग्णलय…
प्रस्तावित केलेली गट क्रमांक 414 मधील 5.87 हेक्टर

बारामतीत आयुर्वेदिक महाविद्यालय आणि १०० बेड चे रुग्णलय…
प्रस्तावित केलेली गट क्रमांक 414 मधील 5.87 हेक्टर
बारामती वार्तापत्र
राज्य शासनाने बारामती तालुक्यातील मेडद येथे आयुर्वेदिक महाविद्यालय उभे करण्याचा निर्णय घेतला असून 100 बेडचे आयुर्वेदिक रुग्णालय देखील येथे होणार आहे.
राज्य शासनाच्या आयुष संचालनालयाने पुण्याच्या जिल्हाधिका-यांना या बाबत पत्र पाठवून माहिती दिली आहे. बारामतीत शासकीय आयुर्वेद महाविद्यालयासाठी जिल्हाधिका-यांनी बारामती मोरगाव रस्त्यावरील मेडद येथील गट क्रमां 414 येथील 5.87 हेक्टर जागा प्रस्तावित केली आहे. या महाविद्यालय व रुग्णालयासाठी किमान पाच एकर जागेची अट आहे. . प्रस्ताव दाखल केल्यानंतर ही जमीन घेतली जाईल असे जिल्हाधिकाऱ्यांना आयुष संचालनालयाने स्पष्ट केले आहे.
राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या पुढाकारातून हे महाविदयालय बारामतीत साकारणार आहे. या मुळे आयुर्वेदीक पध्दतीने उपचार पध्दतीचे प्रशिक्षण बारामतीत विद्यार्थी घेऊ शकतील, शिवाय ज्यांना आयुर्वेदीक पध्दतीने उपचार घ्यायचे आहेत, त्यांच्यासाठीही 100 खाटांच्या क्षमतेचे सर्व सुविधांनी सज्ज असेल रुग्णालयही उभारले जाणार आहे
आता आयुर्वेदीक महाविद्यालयामुळे वैदयकीय शिक्षणाचाही हब म्हणून बारामतीची ओळख होणार आहे. पश्चिम महाराष्ट्रात पुण्यापाठोपाठ आता बारामती शैक्षणिक हब म्हणून उदयास आले असून या महाविद्यालयामुळे आता बारामतीच्या नावलौकीकात आणखी भर पडणार आहे.
यासंदर्भात आयुष संचालनालयाने जिल्हाधिकार्यांना हे शासकीय आयुर्वेदिक महाविद्यालय आयुर्वेदिक रुग्णालयापासून दोन किलोमीटरच्या आत असले पाहिजे अशी अट घातली आहे. याकरिता आवश्यक त्या सर्व उपाययोजना काय कराव्यात अशी सूचना आयुष संचालनालयाचे संचालक वैद्य कुलदीप राज कोहली यांनी जिल्हाधिकाऱ्यांना केली आहे.