लहान मुलांना कोरोणा होऊ नये म्हणून काळजी घ्या. राज्यमंत्री दत्तात्रय भरणे
आतापर्यंत तालुक्यात 96 हजार 101 जणांना लसीकरण पूर्ण झालेले आहे.

लहान मुलांना कोरोणा होऊ नये म्हणून काळजी घ्या. राज्यमंत्री दत्तात्रय भरणे
आतापर्यंत तालुक्यात 96 हजार 101 जणांना लसीकरण पूर्ण झालेले आहे.
निलेश भोंग इंदापूर प्रतिनिधी
कोरोना होऊन गेलेल्या व्यक्तींना म्युकरमायकोसिस हा आजार होत असून यासाठी तालुक्यात सहा दिवसांचे शिबीर लावून त्यांची आरोग्य तपासणी करुन घ्यावी तसेच कोरोनाच्या तिसऱ्या लाटेत लहान मुलांना लागण होऊ नये म्हणून त्यांच्या पालकांना याबाबतची काळजी घेण्यासाठी माहिती पुस्तिका व पत्रके काढण्याचे आदेश राज्यमंत्री दत्तात्रय भरणे यांनी दिले. ते शनिवारी दि.29 रोजी जिल्हा बँकेच्या सभागृहात झालेल्या कोरोना आढावा बैठकीत बोलत होते.
यावेळी पुणे जिल्हाध्यक्ष प्रदीप गारटकर,तहसीलदार अनिल ठोंबरे, गटविकास अधिकारी विजयकुमार परीट, पंचायत समिती सभापती स्वाती शेंडे,उपसभापती संजय देहाडे,नगराध्यक्षा अंकिता शहा,इंदापूर तालुका शिक्षण प्रसारक मंडळाचे सचिव मुकुंद शहा,माजी जि.प.सदस्य प्रतापराव पाटील,पुणे जिल्हा नियोजन समितीचे सदस्य सचिन सपकळ,पुणे जिल्हा कुस्तीगिर संघाचे सदस्य महेंद्र रेडके,अँड.राहुल मखरे,संजय सोनवणे, बाळसाहेब ढवळे,मुख्याधिकारी रामराजे कापरे,पोलिस निरिक्षक धन्यकुमार गोडसे,जीवन माने,दिलीप पवार,डाॅ.सुहास शेळके,डाॅ.नामदेव गार्डे,डाॅ.प्रशांत महाजन आदींसह पंचायत समिती सदस्य, नगरसेवक,प्रशासकीय अधिकारी,नागरिक उपस्थित होते.
राज्यमंत्री भरणे म्हणाले,की कोरोनाची लाट काहीशी अल्प प्रमाणात ओसरत चालली असली तरी मात्र धोका टळलेला नाही. ग्रामीण भागात संख्या जास्त आहे.सध्या तालुक्यात 943 रुग्ण बाधित असून पैकी ग्रामीण भागातील 881 तर शहरात 82 रुग्णांचा समावेश आहे.आतापर्यंत तालुक्यात 96 हजार 101 जणांना लसीकरण पूर्ण झालेले आहे.तालुक्यात सात व्यक्तींना म्युकरमायकोसिस आजाराची लागण झाली असून त्यापैकी एक रुग्ण बरा झाला आहे.