अजित दादा पावर ( उपमुख्यमंत्र्यांनी) आदेशा नंतर नाभिक समाजाला सुद्धा दिला मदतीचा हात.
राज्याचे उपमुख्यमंत्र्यांनी नाभिक समाजाला सुद्धा दिला मदतीचा हात.

राज्याचे उपमुख्यमंत्र्यांनी अजित दादा पावर नाभिक समाजाला सुद्धा दिला मदतीचा हात!
जागतिक कोरोना विषाणूच्या पार्श्वभूमीवर संचारबंदी व लॉकडाऊन काळात वस्तुची विक्री करणाऱ्या दुकानांना उघडण्याची परवानगी दिली असून, सेवा देणाऱ्या सलून दुकानांना राज्य सरकारने परवानगी दिली नसल्याने या व्यवसाय धारकांनी खूप दयनिय अवस्था झालेली आहे.या सर्व बाबींचा विचार करून राज्याचे उपमुख्यमंत्री ना.अजित पवार यांनी बारामती येथील बारामती तालुका नाभिक संघटनेस जीवनावश्यक वस्तुंचे वाटप करून एक मदतीचा हात दिला आहे. माजी नगराध्यक्ष सुभाष सोमाणी, वैभव तावरे व प्रफुल्ल तावरे यांचे या उपक्रमास बहुमोल सहकार्य लाभले.जीवनावश्यक वस्तुंचे वाटप
केल्याने संघटनेचे अध्यक्ष नवनाथ आपुणे,सचिव दीपक यादव, उपाध्यक्ष अमोल साळुके, आदेश आपुणे, हेमंत जाधव,अनिल दळवी, सुधाकर माने, महेंद्र यादव,राजेंद्र जाधव यांनी आभार मानले. सागर माने, सुरेशराव साळुके (सर) यांनी यावेळी उपस्थिती दर्शविली होती.