माळी सेवा संघ इंदापूर तालुका यांचा धरणे आंदोलनास जाहीर पाठिंबा
या आंदोलनाला दिवसेंदिवस विविध संघटना भेट देऊन पाठिंबा देत आहेत
माळी सेवा संघ इंदापूर तालुका यांचा धरणे आंदोलनास जाहीर पाठिंबा
या आंदोलनाला दिवसेंदिवस विविध संघटना भेट देऊन पाठिंबा देत आहेत
बारामती वार्तापत्र
इंदापूर तालुक्यातील २२ गावांना ५ टी एम सी पाणी मंजुरी मिळाली होती. ती रद्द करण्यात आली आहे. त्याचा फेर विचार करून २२ गावांना ५ टी एम सी पाणी पुर्ववत करावे. या प्रमुख मागणी सह इतर ही काही रितसर मागण्यासाठी पिपल्स रिपब्लिकन पार्टी यांच्या वतीने . संजय भैय्या सोनवणे (अध्यक्ष प.महाराष्ट्र पिपल्स रिपब्लिकन पार्टी ) यांच्या नेतृत्वाखाली उजनी धरण,तरटगाव गेट या ठिकाणी *बेमुदत धरणे आंदोलन करण्यात येत आहे.
या आंदोलनाला दिवसेंदिवस विविध संघटना भेट देऊन पाठिंबा देत आहेत आजही इंदापूर तालुका माळी सेवा संघ यांच्या वतीने आंदोलनात सहभागी होऊन जाहीर पाठिंबा दिला व आंदोलन कर्ते मा श्री संजय भैय्या सोनवणे यांच्याशी चर्चा करून आंदोलन अजुन व्यापक व आक्रमक पवित्रा घेऊन आपल्या हक्काचे पाणी मिळेपर्यंत स्वस्त बसायचे नाही अशी मागणी माळी सेवा संघ इंदापूर तालुका अध्यक्ष बापुसाहेब बोराटे यांनी केली.
यावेळी माळी सेवा संघ महाराष्ट्र राज्य कायदेशीर सल्लागार अॅड नितीन जी राजगुरु,युवा क्रांती प्रतिष्ठान चे अध्यक्ष व इंदापूर नगरपालिकेचे स्वीकृत नगरसेवक प्रशांत शिताप, इंदापूर तालुका अध्यक्ष बापुसाहेब बोराटे,इंदापूर तालुका महिला आघाडी अध्यक्षा सौ वर्षाताई माणिक भोंग,इंदापूर तालुका कार्यकारिणी सदस्य अक्षय माळी,इंदापूर शहर अध्यक्ष सुहास बोराटे,सामाजिक कार्यकर्ते संतोष जाधव व इतर सर्व पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.