त्यांनी क्रेन मागवली फक्त एका कुत्र्यासाठी ! परिसरातून होतेय त्या सामाजिक कार्यकर्ते, गणेश पलंगेंचे कौतुक !
गोष्ट छोटी आहे मात्र प्राण्याविषयी तळमळच यातून व्यक्त होते

त्यांनी क्रेन मागवली फक्त एका कुत्र्यासाठी ! परिसरातून होतेय त्या सामाजिक कार्यकर्ते, गणेश पलंगेंचे कौतुक !
गोष्ट छोटी आहे मात्र प्राण्याविषयी तळमळच यातून व्यक्त होते
बारामती वार्तापत्र
वेळ सकाळी 11 वाजता ठिकाण पलंगे पेट्रोलियम समोर तांदुळवाडी अचानक फिरत्या कुत्र्यांची एक झुंड भांडणे करत करत एका विहिरीच्या कडेला आली आणि त्यातील एक कुत्रा विहिरीमध्ये पडला त्या विहिरीला एकही पायरी नव्हती विहीर पाण्याने अर्धी भरली होती पाण्यात पडल्यामुळे कुत्रा जिवाच्या आकांताने ओरडत पाण्यात इकडून तिकडे पोहत फिरत होता.
अर्धा तास कुत्रा विहिरीतून बाहेर निघण्यासाठी धडपडत होता मात्र पायरी नसल्याने फक्त पाण्यातच पोहून त्याला दम लागला होता. ही बाब स्थानिक मजुरांनी सामाजिक कार्यकर्ते, गणेश पलंगे यांच्या कानावर घातली त्यांनी विहिरीच्या ठिकाणी पाहिले असता कुत्रा दम लागून पाण्यात बुडून मरणार अशा अवस्थेत होता. त्यांनी ताबडतोब मोठ्या क्रेन सर्विस ला फोन करून चक्क क्रेन मागवली आणि क्रेनमध्ये बसून दोघांनी या कुत्र्याला सुखरूप बाहेर काढले.
गोष्ट छोटी आहे मात्र प्राण्याविषयी तळमळच यातून व्यक्त होते सामाजिक कार्यकर्ते, गणेश पलंगे हे नेहमीच सामाजिक कार्यात लोकांना मदत करण्यास सदैव तत्पर असतात मात्र आज मुक्या प्राण्यांनाही ते मायेने जवळ करतात हेच यातून दिसले. स्थानिक नागरिकांनीही त्यांच्या या कार्याचे कौतुक केले आहे या वेळी गणेश पलंगे, गितेश पलंगे, देव मोहिते, मच्छिंद्र शेगडे, बबन तावरे यांनी या मोहिमेत सहभाग घेतला.