लॉकडाऊन शिथिल झाल्यानंतर उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या जनता दरबारला नागरीकांची गर्दी..
अजित पवार स्वतः लोकांना भेटत असतात..

लॉकडाऊन शिथिल झाल्यानंतर उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या जनता दरबारला नागरीकांची गर्दी..
गेल्या 2 महिन्यांपासून हा जनता दरबार बंद ठेवण्यात आला होता.
बारामती वार्तापत्र
उपमुख्यमंत्री अजित पवार आज (शनिवारी) बारामती दौऱ्यावर आहेत. येथील विद्याप्रतिष्ठान येथे ते जनता दरबार घेत आहेत. वाढत्या कोरोनाच्या पार्श्वभूमीवर गेल्या 2 महिन्यांपासून हा जनता दरबार बंद ठेवण्यात आला होता. मात्र, आज तो पुन्हा भरवण्यात आला. अजित पवारांना भेटण्यासाठी लोकांची गर्दी झालेली पाहायला मिळाली.तत्काळ आदेश – मतदार संघातील लोकांना त्यांच्या कामासाठी पुणे- मुंबईत भेटायला येऊ लागू नये, म्हणून अजित पवार स्वतः लोकांना भेटत असतात. यावेळी सर्व शासकीय अधिकारी वर्ग उपस्थित असतो.
उपमुख्यमंत्री अजित पवार आज (शनिवारी) बारामती दौऱ्यावर आहेत. येथील विद्याप्रतिष्ठान येथे ते जनता दरबार घेत आहेत. वाढत्या कोरोनाच्या पार्श्वभूमीवर गेल्या 2 महिन्यांपासून हा जनता दरबार बंद ठेवण्यात आला होता. मात्र, आज तो पुन्हा भरवण्यात आला. अजित पवारांना भेटण्यासाठी लोकांची गर्दी झालेली पाहायला मिळाली.
मतदार संघातील लोकांना त्यांच्या कामासाठी पुणे- मुंबईत भेटायला येऊ लागू नये, म्हणून अजित पवार स्वतः लोकांना भेटत असतात. यावेळी सर्व शासकीय अधिकारी वर्ग उपस्थित असतो. नागरीकांचे ज्या विभागाकडे काम आहे. त्या विभागाच्या अधिकाऱ्यांकडे ते नागरिकांचे निवेदन देतात आणि तत्काळ मार्ग काढण्याचे आदेश अजित पवार देत असतात. अजित पवारांना भेटण्यासाठी लोकांनी लांबच लांब रांगा लावल्या आहेत.
यावेळी बारामतीच्या नगराध्यक्षा पौर्णिमा तावरे, पंचायत समितीच्या सभापती निता फरांदे, उपनगराध्यक्ष अभिजीत जाधव, पंचायत समिती उपसभापती रोहित कोकरे, उपविभागीय अधिकारी दादासाहेब कांबळे, महावितरणचे मुख्य कार्यकारी अभियंता सुनिल पावडे, अपर पोलिस अधिक्षक मिलिंद मोहिते, उपविभागीय पोलीस अधिकारी नारायण शिरगावकर, तहसिलदार विजय पाटील, गटविकास अधिकारी राहूल काळभोर, नगरपालिकेचे मुख्याधिकारी किरणराज यादव, सार्वजनिक बांधकाम पूर्व विभाग कार्यकारी अभियंता मिलिंद बारभाई, सार्वजनिक बांधकाम विभागाचे उपअभियंता विश्वास ओव्हाळ, पाटबंधारे विभागाचे कार्यकारी अभियंता धोडपकर, सिल्व्हर ज्युबली रूग्णालयाचे वैद्यकीय अधिक्षक डॉ. सदानंद काळे, तालुका आरोग्य अधिकारी डॉ. मनोज खोमणे, शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाचे अधिष्ठाता डॉ. चंद्रकांत मस्के, रूई ग्रामीण रूग्णालयाचे डॉ. सुनिल दराडे, ज्येष्ठ नगरसेवक किरण गुजर, गट नेता सचिन सातव आदींसह विविध विभागाचे अधिकारी, प्रतिनिधी उपस्थित होते.