राज्याचे आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी लसीकरणाबाबत मोठी घोषणा,घरोघरी होणार लसीकरण; लाभ कुणाला?, वाचा सविस्तर!
जे लोक घरातून बाहेर येऊ शकत नाही, अशांना घरी जाऊन लस देण्यात येणार आहे.

राज्याचे आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी लसीकरणाबाबत मोठी घोषणा,घरोघरी होणार लसीकरण; लाभ कुणाला?, वाचा सविस्तर!
जे लोक घरातून बाहेर येऊ शकत नाही, अशांना घरी जाऊन लस देण्यात येणार आहे.
बारामती वार्तापत्र रिपोर्ट
राज्याचे आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी लसीकरणाबाबत मोठी घोषणा केली आहे. आता घरोघरी जाऊन लसीकरण करण्यात येणार आहे. मात्र घरी जाऊन सरसकट लसीकरण करण्यात येणार नाही. जे लोक व्याधींमुळे किंवा इतर कारणाने घरातून बाहेर पडूच शकत नाही, अशा लोकांचं घरी जाऊन लसीकरण करण्यात येणार आहे. त्यामुळे या लोकांना लसीकरणासाठी लसीकरण केंद्रावर येण्याची गरज राहणार नाही, असं राजेश टोपे यांनी स्पष्ट केलं.
राजेश टोपे आज जालन्यात होते. आता घराघरात जाऊन लसीकरण करण्यात येणार आहे. मात्र, घरोघरी जाऊन लसीकरण करण्याच्या या मोहिमेचा लाभ सर्वांना मिळणार नाही. जे लोक घरातून बाहेर येऊ शकत नाही, अशांना घरी जाऊन लस देण्यात येणार आहे. त्यासाठी वेगळा प्रोटोकॉल तयार करण्यात येणार आहे. जे शारीरिक व्याधीमुळे घराबाहेर पडू शकत नाहीत, अशा लोकांच्या कुटुंबानी लेखी लिहून देणं बंधनकारक आहे. तसेच फॅमिली डॉक्टरचे सर्टिफिकेटही देणे गरजेचे असणार आहे. तरच घरी येऊन लस दिली जाणार आहे, असं टोपे म्हणाले. घरी जाऊन लसीकरण करण्याचं हे काम टास्क फोर्सला देण्यात आल्याची माहितीही त्यांनी दिली.