बारामती शहरातील मुस्लिम बांधवांना जीवनावश्यक वस्तूंचे 500 कीट वाटप
बारामती-: राज्याचे उपमुख्यमंत्री सन्माननीय अजित दादा पवार यांच्या सूचनेनुसार मुस्लिम बँकेचे संचालक अल्ताफ सय्यद तसेच बारामती नगर परिषदेच्या उपनगराध्यक्षा तरन्नुम सय्यद या दांपत्यानं कडून.
बारामती शहरातील मुस्लिम बांधवांना जीवनावश्यक वस्तूंचे 500 कीट वाटप
बारामती-: राज्याचे उपमुख्यमंत्री सन्माननीय अजित दादा पवार यांच्या सूचनेनुसार मुस्लिम बँकेचे संचालक अल्ताफ सय्यद तसेच बारामती नगर परिषदेच्या उपनगराध्यक्षा तरन्नुम सय्यद या दांपत्यानं कडून बारामती शहरातील समर्थ नगर ,मुजावर वाडा ,पतंगशाहा नगर, कसबा, खाटीक गल्ली ,देवळी इस्टेट, खंडोबानगर इत्यादी भागात मुस्लिम बांधवांना एक महिना पुरेल इतके अन्नधान्य व जीवनावश्यक वस्तूंच्या कीट चे वाटप करण्यात आले करोना विषाणूच्या प्रादुर्भावाने आज संपूर्ण देशच संकटात सापडलेला आहे सर्व उद्योगधंद्यावर संकट आलेले आहेत अशा परिस्थितीत वर्षातून एक वेळा येणारा ईद चा सण आनंदात साजरा व्हावा या दृष्टिकोनातून उपमुख्यमंत्री माननीय अजितदादा पवार यांनी अल्ताफ सय्यद व तरन्नुम सय्यद यांच्याकडे प्रत्येक मुस्लिम बहुल भागात किट वाटप करण्याची जबाबदारी सोपवली व रमजान इच्छा मनापासून हार्दिक शुभेच्छा व्यक्त केल्या सय्यद दाम्पत्यांनी देखील आज दिवसभर या संपूर्ण परिसरात स्वतः जाऊन त्याकीट चे वाटप केले याप्रसंगी माजी नगरसेवक अनिल कदम सामाजिक कार्यकर्ते बाळासाहेब पाटील पत्रकार तैनूर भाई शेख सहारा फाउंडेशनचे अध्यक्ष परवेज सय्यद, सुभान कुरेशी , वसीम जब्बार कुरेशी ,आसिफ झारी, सलीम तांबोळी ,अकलाज सय्यद ,हारून( राजू) शेख, जावेद मजलापुरे, रिजवान मुजावर, आफ्रोज मुजावर ,तन्वीर इनामदार ,वाहिद इनामदार ,जमीर इनामदार, वसीम शेख, हरून बाबा शेख सलीम भाई शेख ,समर्थ नगर मधून गणेश कदम, नितीन भागवत, गणेश भोसले ,समीर बागवान ,योगेश गायकवाड व त्या त्या भागातील सर्व प्रमुख कार्यकर्ते उपस्थित होते हे जीवनावश्यक वस्तूंचे किट मिळवून देण्यामध्ये सन्माननीय नगराध्यक्ष पौर्णिमा तावरे तसेच माजी नगराध्यक्ष सुभाष सोमाणी यांनी देखील मोलाचे सहकार्य केल्याची माहिती श्री व सौ सय्यद यांनी दिली.