बारामती दि. 26 जुन नविन कोरोना बाधीत 17, म्युकरमायकोसीस 39, डिस्चार्ज 51
म्युकर मायकाॅसिसचे एकूण रुग्ण- 39 पैकी बारामती तालुक्यातील- 31 इतर तालुक्यातील-08 त्यापैकी उपचार घेणारे- एकूण -13

बारामती दि. 26 जुन नविन कोरोना बाधीत 17, म्युकरमायकोसीस 39, डिस्चार्ज 51
म्युकर मायकाॅसिसचे एकूण रुग्ण- 39 पैकी बारामती तालुक्यातील- 31 इतर तालुक्यातील-08 त्यापैकी उपचार घेणारे- एकूण -13
आज दिनांक 26/6/2021 साठी जिल्हा स्तरावरून कोव्हिशील्ड लस पुरवठा झाला नाही. त्यामुळे नागरिकांचे लसीकरण होणार नाही. लस पुरवठा सुरळीत झाल्यानंतर लसीकरण सत्रांचे आयोजन करण्यात येईल.
बारामती वार्तापत्र
बारामतीत काल केलेल्या 1201 तपासण्यांपैकी अवघे 17 रुग्ण पॉझिटीव्ह आढळले आहेत. एकीकडे तपासण्यांची संख्या वाढविण्याकडे प्रशासनाचा कल असून दुसरीकडे तपासण्या वाढूनही रुग्णसंख्या कमी होणे ही बारामतीसाठी दिलासादायक बाब मानली जात आहे.
बारामतीत ठराविक अपवाद वगळता इतर सर्वच व्यवहारांना दुपारी चारपर्यंत सुरु ठेवण्याची प्रशासनाने परवानगी दिली आहे. त्या नंतर काही दिवसात रुग्णसंख्या वाढते की काय अशी शंका निर्माण झाली होती. प्रत्यक्षात बारामतीची परिस्थिती तुलनेने उत्तम आहे. रुग्ण सापडण्याचे प्रमाण आता नगण्य झाले आहे.
आज बारामती शहरात 8 आणि बारामती ग्रामीण मध्ये 9 रुग्ण
काल झालेल्या शासकीय rt-pcr नमुन्यामध्ये 650 नमुन्यामधून एकूण पॉझिटिव्ह 4 रुग्ण आहेत,तर प्रतीक्षेत – 76. इतर तालुक्यातील रुग्ण – 4.पॉझिटिव्ह आहेत.
काल तालुक्यातील खाजगी प्रयोगशाळेत तपासणी केलेले एकूण rt-pcr 33 नमुन्यांपैकी 7 रुग्ण पॉझीटीव्ह.
तर एंटीजनच्या 594 नमुन्यांपैकी एकूण 6 रुग्ण पॉझिटिव्ह आले आहेत.
बारामती तालुक्यातील शासकीय आकडेवारीनुसा काल दिवसभरातील बारामतीतील एकूण पॉझिटिव्ह रुग्ण संख्या 17 झाली आहे.
बारामती मधील एकूण रुग्ण संख्या 25495 झाली आहे, 24586 जणांनी आतापर्यंत कोरोनावर यशस्वीरीत्या मात केली आहे,बारामती तालुक्यातील शासकीय आकडेवारीनुसार 653 जणांचा आत्तापर्यंत मृत्यू झाला,तर काल 51 जण कोरोना मुक्त झाले आहेत.
काल केलेल्या तपासणीमध्ये 17 रुग्ण आढळून आले, दुसरीकडे काल कोरोनाने बारामतीत एकही मृत्यू झाला नाही आणि कालच्या एकाच दिवसात तब्बल 7285 जणांचे लसीकरण प्रशासनाने पूर्ण केले. या बाबी बारामतीकरांसाठी दिलासादायक आहेत. बारामतीत कालपर्यंत 1लाख 29 हजार 51 जणांचे लसीकरण पूर्ण झाले आहे. वेगाने लसीकरण करण्यासोबतच ज्या गावांची लोकसंख्या कमी आहे, त्या गावांचे शंभर टक्के लसीकरण करण्याच्या दृष्टीने प्रशासन प्रयत्न करीत आहे.
उद्यापासून बारामती शहर व तालुक्यातील आरटीपीसीआर व रॅपिड अँटीजेन तपासण्या वाढविल्या जाणार आहेत. ठिकठिकाणी जाऊन आरोग्य विभागाची यंत्रणा या तपासण्या करणार असून नागरिकांनी विनंती केल्यानंतर तपासणीसाठी सहकार्य करावे, असे आवाहन प्रशासनाच्या वतीने करण्यात आले आहे.
तुम्ही काळजी घ्या ,अनावश्यक गर्दी टाळा ,सॅनिटायझर ,मास्कचा वापर करा