संजय गांधी निराधार अनुदान योजना समितीची पहिली बैठक संपंन्न ; पहिल्याच बैठकीत 48 अर्जांना मंजूरी
61 अर्ज प्राप्त आले होते. त्यापैकी 48 अर्ज मंजूर करण्यात आले

संजय गांधी निराधार अनुदान योजना समितीची पहिली बैठक संपंन्न ; पहिल्याच बैठकीत 48 अर्जांना
61 अर्ज प्राप्त आले होते. त्यापैकी 48 अर्ज मंजूर करण्यात आले मंजूरी
बारामती वार्तापत्र ; निलेश भोंग प्रतिनिधी
संजय गांधी निराधार अनुदान योजना समितीची स्थापना झाल्यानंतर मंगळवार दि.29 रोजी इंदापूर तहसील कार्यालयात समितीची पहिली आढावा बैठक पार पडली.या पहिल्याच बैठकीत 48 लाभार्थ्यांच्या अर्जांना मंजुरी देण्यात आली.तर 13 अर्ज अपात्र ठरवण्यात आले.
या बैठकीस तहसलीदार अनिल ठोंबरे,नायब तहसीलदार वैयंकर मॅडम यांसह समितीचे अध्यक्ष व सर्व सदस्य आणि समता सैनिक दलाचे पुणे जिल्हाध्यक्ष अशोक पोळ, प्रहार अपंग संघटनेचे पुणे जिल्हा उपाध्यक्ष बाबासाहेब पाडुळे, तालुकाध्यक्ष अनंतराव गायकवाड आदी उपस्थित होते.
कोरोनाच्या काळात सॅनिटायझर व मास्क वापरणे गरजेचे आहे या व्यापक कल्पनेतून तहसील कार्यालय इंदापूर कडून समितीचे तालुकाध्यक्ष सागर मिसाळ, सदस्य लक्ष्मण परांडे,महादेव लोंढे,आबासाहेब निंबाळकर, दत्तात्रय बाबर,अजय भिसे व महिला सदस्य रहेना मुलाणी यांचा गुलाबपुष्प ,सॅनिटायझर व मास्क देऊन सन्मान करण्यात आला.
शासकीय योजनांच्या लाभासाठी एकूण 61 अर्ज प्राप्त आले होते. त्यापैकी 48 अर्ज मंजूर करण्यात आले.यात संजय गांधी निराधार अनुदान योजनेसाठी 7 अर्ज, श्रावणबाळ सेवा राज्य निवृत्ती वेतन यासाठी 23 ,इंदिरा गांधी राष्ट्रीय वृद्धापकाळ निवृत्ती वेतन योजना यासाठी 17 व इंदिरा गांधी राष्ट्रीय विधवा निवृत्ती वेतन योजना यासाठी एक अर्ज मंजूर करण्यात आला.तर 13 अर्ज योजनेच्या निकषात न बसल्याने नामंजूर करण्यात आले.नामंजूर करण्यात आलेल्या अर्ज धारकांना आवश्यक निकषांसह ते पुन्हा सादर करण्यास सांगितले जाईल असे तहसीलदार तथा संजय गांधी निराधार योजना शासकीय समितीचे सचिव अनिल ठोंबरे यांनी बैठकीत सांगितले.
सागर मिसाळ म्हणाले,की आजच्या या बैठकीच्या निमित्ताने पहिल्याच मीटिंगमध्ये 48 अर्जाला मंजूरी देण्यात आली आहे. ज्या हेतूसाठी आपली सर्वांची या योजनेच्या कामकाज कामी नियुक्ती करण्यात आली आहे.योजनेचा तो मुळ उद्देश आपण तळागाळातल्या व्यक्तींपर्यंत पोहचवण्यासाठी आपण सर्व सदस्य सचिव एकोप्याने काम करुन योजनेचा हेतू सफल करुया.
या विविध योजनांचा लाभ घेण्यासाठी वयाच्या दाखल्याच्या पुराव्यासंदर्भात अडचणी निर्माण होत आहेत यासाठी इंदापूर उपजिल्हा रुग्णालय किंवा ग्रामीण रुग्णालय निमगाव केतकी या ठिकाणचा दाखला ग्राह्य धरला जातो. मात्र यामध्ये नागरिकांना प्रचंड त्रास होत असून इंदापूर तालुक्यात कार्यरत असणारे प्राथमिक आरोग्य केंद्रातील शासकीय डॉक्टर यांच्या सहीने देण्यात येणारा वयाचा पुराव्याचा दाखला या योजनेसाठी ग्राह्य धरण्यात यावा. यासाठी तहसीलदार यांनी योग्य तो निर्णय करावा अशी मागणी यावेळी सागर मिसाळ यांनी केली.