बारामतीत त्यांचे तपासणी अहवाल निगेटिव्ह.
बारामती शहरातील दूध संघ वसाहत येथील कोरोना संक्रमित रुग्णाच्या संपर्कातील १५ जणांचा तपासणी अहवाल निगेटिव्ह आला आहे.
तसेच शहरातील इतर ३ जणांचे तपासणी अहवाल देखील निगेटिव्ह आले असल्याची माहिती तालुका आरोग्य अधिकारी डॉक्टर मनोज खोमणे यांनी दिली आहे.
शहरातील दूध संघ वसाहत येथील 29 वर्षीय तरुणास कोरोनाची लागण
झाल्याचे तपासणी अहवालात निष्पन्न झाले होते. त्यानंतर त्या तरुणाचा दुसरा तपासणी अहवाल निगेटिव्ह आला आहे.
पहिला अहवाल पॉझिटिव्ह आलेले त्याचे संपर्कातील पंधरा जणांची तपासणी
करण्यात आली.
दुध संघ वसाहतची सीमा गृहीत धरुन प्रतिबंधित क्षेत्र म्हणून घोषित केले आहे. निगेटिव्ह अहवाला मुळे नातेवाईक यांनी सुटकेचा निश्वास टाकला आहे.