माळेगावचे राजकारण तापले माजी सरपंचाला अटक केल्याच्या निषेधार्थ उद्या माळेगाव बंद व निषेध सभा! बंद बाबत जनतेमध्ये उलट – सुलट चर्चा…
गुरूवारी सकाळी नऊ वाजता राजहंस चौकात यासंदर्भात निषेध सभा होणार

माळेगावचे राजकारण तापले माजी सरपंचाला अटक केल्याच्या निषेधार्थ उद्या माळेगाव बंद व निषेध सभा! बंद बाबत जनतेमध्ये उलट – सुलट चर्चा…
गुरूवारी सकाळी नऊ वाजता राजहंस चौकात यासंदर्भात निषेध सभा होणार
बारामती वार्तापत्र
माळेगाव येथील राष्ट्रवादीचे युवा नेते रविराज तावरे यांच्यावरील गोळीबार प्रकरणी तावरे यांनी दिलेल्या जबाबानंतर माजी सरपंच जयदिप दिलीप तावरे यांना पोलिसांनी अटक केली. या अटकेच्या निषेधार्थ उद्या (ता.८) माळेगाव बंद पुकारण्यात आला आहे. त्यामुळे माळेगावच्या राजकारण यापुढे चांगलेच तापणार असे चित्र असून जनतेमध्ये बंद बाबत उलट – सुलट चर्चेला उधाण आले आहे. रविराज तावरे यांच्या वर झालेल्या गोळीबारानंतर माळे गावाचे रजाकरण चागलेच ढवळून निघाले आहे. राष्ट्रवादीचे माजी सरपंच जयदिप दिलीप तावरे यांच्यावर खोटी फिर्याद दिल्याबद्दल फिर्यादीचा जाहीर निषेध व माळेगाव बंदचे आवाहन जयदीप तावरे यांच्या समर्थकांकडून केले असून गुरूवारी सकाळी नऊ वाजता राजहंस चौकात यासंदर्भात निषेध सभा होणार असल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे. खोटी फिर्याद देऊन ही अटक झाली असल्याचा आरोप यामध्ये करण्यात आला आहे.
दरम्यान सोमवार दि.05 रोजी रात्री जयदिप तावरे यांना पोलिसांनी ताब्यात घेऊन अटक केली. यासंदर्भात रविराज तावरे यांनी दवाखान्यातून डिस्चार्ज मिळाल्यानंतर घटनेसंदर्भातील मागील काही दिवसा्ंतील घडामोडींसदर्भात जबाब दिला होता. त्यामध्ये या घटनेत जयदिप तावरे यांचाही सहभाग असल्याचे त्यांनी नमूद केल्याने पोलिसांनी त्यांना अटक केली आहे.मात्र या बंदच्या नागरिकांमध्ये उलट – सुलट चर्चा घडत असून बंद बाबत