
पाचशे साठी बापावर कटरने वार मुलावर गुन्हा दाखल
खर्चीला ५०० रूपये मागीतले.
निलेश भोंग: बारामती वार्तापत्र
५०० रूपयांसाठी वडीलांना लाथाबुक्यांनी मारहाण करून, जन्मदात्या बापाच्या पाठीवरचं रेडीयम कापायच्या कटरने जिवघेणा वार करुन पित्यास जीवे मारण्याची धमकी देण्याचा प्रकार इंदापूर तालुक्यातील वडापुरी येथे घडलाय. बाळासाहेब पंढरीनाथ माने (वय ६०) रा. वडापुरी, ता.इंदापूर,जि.पूणे असे जखमी पित्याचे नांव असून आरोपी मुलगा संतोष बाळासाहेब माने.रा.वडापुरी,ता.इंदापूर याविरूद्ध त्यांनी इंदापूर पोलिसात फिर्याद दिली आहे.
मंगळवार दि.६ जुलै २०२१ रोजी रात्री साडेनऊ चे सुमारास बाळसाहेब माने त्यांची पत्नी रूक्मीनी आणि मुलगा संतोष हे जेवन उरकून घरासमोरील ओट्यावर गारव्याला बसले होते.याचवेळी मुलगा संतोषने वडील बाळासाहेब यांकडे खर्चीला ५०० रूपये मागीतले. त्यावर जरा काही तरी काम धंदा कर असं उत्तर वडील बाळासाहेब माने यांनी मुलगा संतोष ला दिले.
यावर संतप्त झालेल्या संतोषने थेट आपल्या बापावरचं हात उचलला, लाथाबुक्यांनी मारहाण केली. तो एवढ्यावरच थांबला नाही तर रेडियम कापायचे कटरने जन्मदात्या पित्याच्या पाठीवर थेट वार करीत खर्चीला पैसे न दिल्यास खल्लास करून टाकण्याची धमकीचं दिली. जखमी बाळासाहेब माने यांनी इंदापूर पोलीस ठाण्यात मुलगा संतोष विरूद्ध तक्रार दिली आहे,आता इंदापूर पोलीस याला काय धडा शिकवणार हे पहावे लागेल.