राज्यमंत्री दत्तात्रय भरणे यांच्या माध्यमातून काटी- वडापुरी जिल्हा परिषद गटाला २ कोटी ११ लाख रुपयांचा भरगोस निधी – अभिजीत तांबिले.
दलित वस्तीवरील प्रत्येक नागरिकांच्या समस्या जाणून तसेच सामान्य नागरिकांना केंद्र बिंदू मानून

निलेश भोंग ; बारामती वार्तापत्र
काटी-वडापुरी जिल्हा परिषद गटामध्ये इंदापुर मतदार संघाचे लोकप्रतिनिधी तथा राज्यमंत्री दत्तात्रय भरणे यांच्या माध्यमातून २ कोटी ११ लक्ष निधी प्राप्त झाला आहे अशी माहिती जिल्हा परिषद सदस्य अभिजित तांबिले यांनी दिली.
पुढे अभिजित तांबीले म्हणाले की जिल्हा परिषद सदस्य या नात्याने मी जिल्हा परिषद गटामधिल प्रत्येक गावामधिल वाड्या वस्त्यांवरील अडीअडचणी समजावून तसेच मतदार संघा मधिल मागासवर्गीय ,दलित वस्तीवरील प्रत्येक नागरिकांच्या समस्या जाणून तसेच सामान्य नागरिकांना केंद्र बिंदू मानून राज्याचे राज्यमंत्री दत्तात्रय भरणे यांच्या माध्यमातून जास्तीत जास्त निधी काटी-वडापुरी जिल्हा परिषद मतदार संघामध्ये आणण्याचे काम केले आहे.
जिल्हा परिषद गटांमधील विकासासाठी सतत निधी उपलब्ध करण्यासाठी वेळोवेळी पाठपुरावा केल्याने काटी-वडापुरी जिल्हा परिषद गटासाठी २ कोटी ११ लक्ष निधी विविध विकास कामांसाठी उपलब्ध झाला आहे.