आमदार राहुल कुल यांना आदर्श संसदपटू पुरस्कार प्रदान..
दौंड विधानसभा मतदार संघातील सर्व मतदार बंधू भगिनींना मी हा पुरस्कार समर्पित करतो.
आमदार राहुल कुल यांना आदर्श संसदपटू पुरस्कार प्रदान..
दौंड विधानसभा मतदार संघातील सर्व मतदार बंधू भगिनींना मी हा पुरस्कार समर्पित करतो.
विधान मंडळात जनतेचे प्रश्न सोडविण्यासाठी सातत्याने विधिमंडळाच्या कामकाजात प्रयत्नशील राहून उत्कृष्ट कामकाज केल्याबदल दौंड चे भाजप चे आमदार राहुल कुल यांना महाराष्ट्र शासन व महाराष्ट्र विधिमंडळाच्या राष्ट्रकुल संसदीय मंडळाद्वारे सन २०१७-१८ चा अधिकृत ‘आदर्श संसदपटू’ पुरस्कार देण्यात आला आहे,
महाराष्ट्र विधानपरिषद सभापती रामराजे नाईक -निंबाळकर व महाराष्ट्र विधानसभा उपाध्यक्ष नरहरी झिरवळ यांचे हस्ते देण्यात आला..
“ज्यांच्या आशीर्वादाने मला विधानसभेत काम करण्याची संधी मिळाली त्या दौंड विधानसभा मतदार संघातील सर्व मतदार बंधू भगिनींना मी हा पुरस्कार समर्पित करतो.., माझ्यावर जीवापाड प्रेम करणाऱ्या, मला सदैव मोलाचे सहकार्य करणाऱ्या माझ्या तमाम सहकाऱ्यांचे देखील शतशः आभार ” अशी फेसबुक पोस्ट कुल यानी केली आहे..